Tarun Bharat

पाणीपुरवठा खात्याचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळय़ात

कंत्राटदाराकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

प्रतिनिधी /बेळगाव

अथणी येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे साहाय्यक कार्यकारी अभियंते व कार्यालयीन व्यवस्थापकाला लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱयांनी रंगेहाथ पकडले आहे. बुधवारी अथणी येथे ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

साहाय्यक कार्यकारी अभियंते राजेंद्र इंद्राप्पा परनाकर व कार्यालयीन व्यवस्थापक दीपक कृष्णाजी कुलकर्णी यांना एका कंत्राटदाराकडून 68 हजार रुपये लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. जलजीवन मिशनअंतर्गत कामाचे कंत्राट घेतलेल्या एका कंत्राटदाराकडून या अधिकाऱयांनी तीन टक्के लाच मागितली होती.

एसीबीचे पोलीस प्रमुख बी. एस. न्यामगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक करुणाकर शेट्टी, पोलीस निरीक्षक अडविश गुदीगोप्प, सुनीलकुमार व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. एकूण योजनेच्या तीन टक्के रक्कम लाच स्वरुपात मागितल्यामुळे कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. त्यामुळे रंगेहाथ अटक करण्यात आली.

Related Stories

मुरुगेश निरानी; कर्नाटकच्या मुख्यमंत्री यादीतील नवीन नाव

Abhijeet Khandekar

वीरभद्रनगरातील पावसाच्या पाण्याची समस्या सोडवा

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यातील शेतकरी गुंतले भातकापणीत

Amit Kulkarni

हृदयविकाराबाबत समाजात जनजागृती आवश्यक

Amit Kulkarni

डॉ. शिवबसव महास्वामीजींचा रविवारपासून जयंती महोत्सव

Amit Kulkarni

युवकाचा खून करून मृतदेह रेल्वेरुळावर

Amit Kulkarni