Tarun Bharat

पाणी आणि हृदयक्रिया

आपले शरीर जेव्हा हायड्रेट असते, तेव्हा सर्व अवयव योग्य रितीने काम करत असतात. एवढेच नाही तर हृदय देखील सक्षमपणे काम करते. त्यामुळे शरीरात पाण्याचे पुरेसे प्रमाण असणे गरजेचे आहे.

  • पाणी प्यायल्याने हृदयासंबंधीच्या अनेक आजाराची जोखीम कमी करण्यास मदत मिळते.
  • एका अभ्यासातून स्पष्ट झाले की, पुरेशा प्रमाणात पाणी पिल्याने आपले हृदय चांगल्या रितीने काम करते. यूएस नॅशनल हार्ट, लंग्ज अँड ब्लड इन्स्टिटय़ूटने केलेल्या अभ्यासात 15 हजार लोकांना सामील केले गेले. त्यांचे वय 25 ते 60 पर्यंत होते. सुमारे 25 वर्षे त्यांची निरीक्षणे नोंदवून त्याचे विश्लेषण करण्यात आले. यानुसार अनेकांच्या रक्तात पाण्याचे प्रमाण कमी आणि मिठाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. ते हृदयविकाराच्या जोखमीत सामील होते. या लोकांचे एक किंवा दोन दशकांनंतर हृदयासारखे अवयव योग्य रितीने काम करेनासे झाले होते.
  • या अभ्यासानुसार सामान्य प्रमाणात सोडियमचे सेवन करत असाल तर हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अधिकाधिक पाणी प्राशन करायला हवे.
  • सामान्यतः एका महिलेला दिवसातून सहा ते आठ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी पिणे जमत नसल्यास हेल्दी ड्रिंक्सचे प्राशन करावे.  एका पाहणीनुसार, केवळ 60 टक्के महिलाच दिवसभरात पुरेसे पाणी पितात.
  • शरीरातील हायड्रेशनचा शोध हा रक्तात आढळून येणार्या सोडियमच्या प्रमाणातून घेऊ शकतो. जेव्हा आपण पाण्याविना राहता, तेव्हा आपल्या रक्तात सीरम सोडियम कन्सेट्रेशन वाढू लागते. या काळात आपले शरीर पाणी शोषण्यास सुरू करते. यात हृदरोगाची समस्या निर्माण होऊ लागते.

Related Stories

हृदयविकाराच्या धक्क्याची पूर्वसूचना देणार एक्सरे

Patil_p

कार्डिओ रोज गरजेचे

Archana Banage

जाणून घ्या ब्लॅक टी पिण्याचे फायदे

Kalyani Amanagi

पेरू खाण्याचे फायदे जाणून घ्या

Abhijeet Khandekar

चीनमध्ये ‘कोरोना’ बळींची संख्या 2663 वर

tarunbharat

उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्सपेक्षा हेल्दी असणारे फ्रुट ज्यूस

Kalyani Amanagi
error: Content is protected !!