Tarun Bharat

पाण्याच्या प्रतीक्षेत वाया गेली रविवारची सुटी

चव्हाट गल्ली परिसरातील पाणी पुरवठा ठप्प, शहरवासियांतून संताप

प्रतिनिधी /बेळगाव

शहरातील पाणी टंचाईचा खेळखंडोबा सुरूच असून सुरळीत पाणी पुरवठय़ासाठी रस्त्यावर येवून आंदोलन छेडूनेदेखील पाणीपुरवठा नियोजनात कोणताच बदल होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. रविवारी चव्हाट गल्लीसह विविध परिसरात पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक होते. पण रविवारी पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरिकांना दिवसभर पाण्यासाठी प्रतीक्षा करीत बसावे लागले. पाण्याच्या प्रतीक्षेत रविवारची सुटी वाया गेल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

मागील सहा महिन्यापासून पाणीपुरवठय़ाचे नियोजन पूर्णतः बारगळले असून नागरिकांना वेळेत आणि मुबलक पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मागील आठवडय़ात विविध भागात पाणीपुरवठा झाला नाही. काही भागात दहा दिवसापासून पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागली. पाणी टँकरने विकत घ्यावे लागल्याने आर्थिक भूर्दंड सोसावा लागला. पाणी टंचाईची समस्या सातत्याने भेडसावत असल्याने शिवबसव कॉलनी परिसरातील महिलावर्गाने रास्तारोको केला होता.

त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांनी दिले होते. दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगून केवळ दोन दिवस झाले नाहीत. तोच शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.

हिडकल जलवाहिनीचा पंप खराब झाल्याने पाणीपुरवठा बंद

पाणीपुरवठय़ाच्या वेळापत्रकानुसार उत्तर विभागात येणाऱया चव्हाट गल्ली, शेट्टी गल्ली, दरबार गल्ली अशा विविध भागात रविवारी पाणीपुरवठा करण्यात येणार होता. पण या भागात रविवारी पाणीपुरवठा झालाच नाही. पाण्यासाठी नागरिकांना दिवसभर प्रतीक्षा करीत बसण्याची वेळ आली. पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरिकांनी व्हॉल्वमन व वरि÷ अधिकाऱयांकडे चौकशी केली असता हिडकल जलवाहिनीचा पंप खराब झाल्याने पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.

पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱयांकडे चौकशी केली असता, हिडकल पंपहाऊसमधील विद्युतपंप नादुरूस्ती झाल्याने रविवारी सकाळपासून हिडकल जलाशयाचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. पण दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येईल असे सागितले. पण पाण्यासाठी प्रतीक्षा करण्यात नागरिकांची रविवारची सुट्टी वाया गेली. पाणीपुरवठय़ाच्या अयोग्य नियोजनामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अपुरा आणि रात्री-अपरात्री होणाऱया पाणीपुरवठय़ामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

मळेकरणी देवी परिसरातील झोपडपट्टय़ांवर कारवाई

Amit Kulkarni

काळय़ादिनी काळे ध्वज, काळा मास्क, काळी फीत

Patil_p

महापालिका वॉर्ड पुनर्रचना कधी?

Patil_p

युनियन जिमखाना, विजया अकादमी संघाची विजयी सलामी

Amit Kulkarni

सरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी हतबल

Amit Kulkarni

जिल्हय़ात 205 नवे रुग्ण, 529 जण कोरोनामुक्त

Omkar B
error: Content is protected !!