Tarun Bharat

पाथरटच्या गुरूजींनी केल्या शाळेच्या अबोल भिंती बोलक्या!

मुख्याध्यापक रामचंद्र परचंडे यांच्या कुंचल्यातून सजली शाळा

प्रतिनिधी/ रत्नागिरी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने यावर्षी शैक्षणिक वर्षाला अजूनही प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे सर्व शाळा बंद झाल्या आहेत. हीच संधी साधत  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरटच्या शिक्षकांनी स्वतः रंगाचा ब्रश हातात घेतला आणि अबोल भिंती सजल्याच नाही तर बोलूही लागल्याचा प्रत्यय येत आहे. 

  सृजनशील व उपक्रमशील शिक्षक शाळेत आले की शाळेचा चेहरामोहरा कसा बदलतो, याच नितांत उदाहरण म्हणजे रत्नागिरी तालुक्यातील पालीनजीकची जिल्हा परिषदची पाथरट शाळा.  लॉकडाऊनच्या काळात गावातील तरुणांना सोबत घेत स्वतः शाळेच्या संरक्षक भिंतीवर रंगकाम करण्याचे काम मुख्याध्यापक रामचंद्र परचंडे यांनी केले. तसेच शाळेचे प्रवेशद्वार व संरक्षक भिंतीवर शिक्षणाची माहिती देणारे फलक तयार केले. मुले कार्टूनकडे आकर्षित होतात. हे लक्षात घेऊन कार्टूनच्या चित्रातून शैक्षणिक संदेश देण्यारे फलक तयार केले. या पेटिंगमधून जिल्हा परिषदेच्या शाळा कशा दर्जेदार आहेत, याची मांडणी केली आहे. संरक्षक भिंतीवरील पेंटेगमुळे शाळेच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.

   इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. या शाळेत बदलीने आलेले शिक्षक रामचंद्र माधवराव परचंडे आणि केशव सूर्यभान घोरोवाडे यांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश सावंत, समिती सदस्य, पालक व ग्रामस्थ यांच्या मदतीने शाळेत आजपर्यंत विविध उपक्रम राबवले आहेत. सेमी इंग्रजी शाळा, विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस, शालेय बचत बँक व जिल्हास्तरीय अनेक उपक्रमात सहभाग घेऊन शाळेत नवचैतन्य आणण्याचे काम केले. मोलमजुरी करणाऱया ग्रामस्थांना हाताशी धरून आपली शाळा सुंदर व सुसज्ज बनवण्याचा निर्धार केला. ग्रामस्थांना आर्थिक मदत करणे शक्य नसले तरी श्रमदानासाठी नेहमी तत्पर असतात. शाळेचे बागकाम, छप्पर दुरुस्ती, नळ-पाणी दुरुस्ती यासारखी कामे पालकांनी श्रमदानातून केली आहेत.

   शाळेची इमारत जुनी असल्याने रंगकाम करून त्याची शोभा वाढवावी, यासाठी गावातील तरुणांना सोबत घेऊन शिक्षकांनी शाळेचे रंगकाम केले. अशा शिक्षकांच्या मेहनतीमुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा आज दर्जेदार आणि गुणात्मक होत आहेत. परचंडे यांना उत्तम सहकार्य लाभले ते त्यांचे शाळा सहकारी केशव घोरोवाडे यांचे. तसेच शाळा कापडगाव नं. 1 चे शिक्षक चांडसुरे व वेळवंड नं 3 चे शिक्षक क्षीरसागर यांचेही उत्तम सहकार्य लाभले. शाळेच्या सर्वांगिण विकासासाठी दोन्ही शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश सावंत व सर्व सदस्य माजी विद्यार्थी मंचाचे अध्यक्ष संतोष धाडवे, उपाध्यक्ष दिनेश धाडवे, पोलीस पाटील प्रकाश गराटे व समस्त पालक व ग्रामस्थांचे मोलाचे योगदान असल्याने शाळाच्या विकासाचा आलेख चढता आहे.

Related Stories

सावंतवाडी खासकिलवाडा येथील तरुणाचा शॉक लागून मृत्यू

Anuja Kudatarkar

इंधन दरवाढ, शेतकरी कायद्याविरोधात

Patil_p

जिह्यात एसटीच्या 43 कर्मचाऱयांच्या बदल्या

Patil_p

बेरोजगार उमेदवारांना ऑनलाईन सुविधा

NIKHIL_N

मासळीची आवक वाढली, दरांमध्ये घसरण

Omkar B

गाबित समाजतर्फे १७ रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Tousif Mujawar