Tarun Bharat

पानमंगरूळ येथे विवाहितेला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Advertisements

प्रतिनिधी / अक्कलकोट

पानमंगरूळ ता.अक्कलकोट येथे मंगळवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वा. चे सुमारास एका २२ वर्षीय विवाहित महिला शेतातील वस्तीवर आपल्या मुलांना भेटायला गेली असता पती, सासु व पतीसोबत असलेल्या बाई असे तिघांनी मिळुन शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून गळ्यातील अर्धा तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने तोडुन घेतल्याची घटना घडली.

याची दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये पती शिवनिंगमा शिवण्णा कुडल, सासु कस्तुराबाई शिवण्णा कुडल व जयश्री शहाणे या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्याद पत्नी शिवलिला शिवनिंगप्पा कुडल, (वय-२२ वर्षे)हिने दिले. याबाबत पोलीस सुत्राकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, पती शिवनिंगप्पा शिवण्णा कुडल यांनी फिर्यादी पत्नीस “तु माझे मुलाकडे यायचे नाही. तुझा यांचेशी काहीही संबंध नाही,” असे म्हणून लाकडाने डावे पायाचे टाचेवर मारले. त्यात जबर मार लागुन सुज आली आहे.तर सासु कस्तुराबाई शिवण्णा कुडल हिने तुझी आम्हाला काही गरज नाही, माझ्या मुलाने दूसरी बाई आणुन ठेवली आहे.

तुझा आमचा काहीही संबंध नाही, तु इथुन निघुन जा म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली. तर पती सोबत असलेल्या जयश्री शहाणे हिने पतीने धरलेवर हाताने फिर्यादीच्या गालावर चापट मारुन तिच्या गळ्यातील अर्धा तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हाताने हिसका देवुन तोडुन घेतले म्हणुन तिघाविरुध्द गुन्हा दाखल आहे.

फिर्यादी महिलेस एक वर्षाचा मुलगा श्री, तीन वर्षाची मुलगी अन्त्रिता असे दोन मुले आहेत.पती शेती करतात.पतीचे दुस-या बाईसोबत अनैतिक संबध असल्याचे पत्नीस समजल्यावर पतीस याबाबत विचारले असता त्यांनी मला तुला काय करायचे आहे तुला संसार करायचा असेल तर गप्पा रहा. नाहीतर निघुन जा. म्हणून मला शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण घराबाहेर काढले. शेतातील वस्तीवर दोन्ही मुलांना घेवुन सासु कस्तुराबाई व ठेवलेली बाई जयश्री शहाणे हिचेसोबत राहणेस गेले. मंगळवारी पत्नी शेतातील वस्तीवर मुलांना भेटण्याठी गेली असता ही घटना घडली. पत्नी तेथुन माहेरी कणबस, ता.द. सोलापूर येथे जावून घडला प्रकार आईस सांगुन दोन दिवस घरी विचार करुन गुरूवारी गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

बनावट नोटा व पिस्तूल बाळगणारी टोळी जेरबंद

Archana Banage

बणजगोळ येथे दोन गटात मारामारी; १२ जणांवर गुन्हे दाखल

Abhijeet Khandekar

अक्कलकोटमधील कोव्हिड १९ मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना ५० हजारचे अनुदान मिळणार

Abhijeet Khandekar

सोलापुरात नव्याने आढळले 6 कोरोनाबाधीत रूग्ण

Archana Banage

मुलाचे भांडण सोडवताना धक्काबुक्कीत वृद्धाचा मृत्यू

Kalyani Amanagi

Kolhapur; दूरशिक्षणच्या पदवी प्रथम वर्षाला युजीसीकडून मान्यता

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!