Tarun Bharat

पायलटांकडून 35 कोटींची ऑफर

Advertisements

काँग्रेस आमदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ : कायदेशीर कारवाईचा सचिन पायलट यांचा इशारा

जयपूर, नवी दिल्ली / वृत्तसंस्था

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद विकोपाला गेला असतानाच राजस्थानमधील काँग्रेसचे आमदार गिरिराज मलिंगा यांनी पायलट यांच्यावर केलेल्या मोठय़ा ‘ऑफर’बारने खळबळ निर्माण झाली आहे. काँग्रेस सोडण्यासाठी पायलट यांच्याकडून आपल्याला 35 कोटींची ऑफर देण्यात आली होती, असा दावा आमदार मलिंगा यांनी केला आहे. या आरोपानंतर पायलट यांनीही मौन सोडले असून निराधार आरोप करणाऱया आमदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे.

काँग्रेस आमदार गिरिराज मलिंगा यांनी सोमवारी प्रथमच सचिन पायलट यांच्यावर विविध आरोप केले. डिसेंबर महिन्यात मी पायलट यांना त्यांच्या घरी भेटलो होतो. यावेळी त्यांनी मला काँग्रेस सोडण्यासाठी 35 कोटींची ऑफर दिली होती. राज्यसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी मला आमिष दाखविले होते, असा दावा मलिंगा यांनी केला आहे. तसेच मी देवाच्या मूर्तीवर हात ठेवून हे सांगू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मलिंगा सलग तीन वेळा आमदार झालेले आहेत. सर्वप्रथम ते बहुजन समाज पक्षाचे आमदार बनले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत गेहलोत सरकारची साथ धरली होती.

मलिंगा यांनी या आरोपांबाबत बोलताना आपल्याकडे कोणताही ठोस पुरावा नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, शिव मंदिरातील मूर्तीवर हात ठेवूनही याची कबुली देऊ शकतो, असे ते म्हणाले. पायलट यांच्यासोबत झालेल्या चर्चेचे रेकॉर्डिंग मी केलेले नाही. रेकॉर्डिंग कसे करावे हेदेखील मला माहिती नाही. मात्र, त्यांनी पैशांची मोठी ऑफर दिल्याची बाब पूर्णपणे खरी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची सूचनाही मला करण्यात आली. मात्र, यासंबंधी भाजपच्या कोणत्याही नेत्याने माझ्याशी कधी संपर्क साधला नाही. तसेच मी भाजपमध्ये जाण्यास स्पष्टपणे नकार दिला होता, असेही मलिंगा यांनी सांगितले.

प्रतिमा मलीन करण्यासाठी आरोप : पायलट

माझ्यावर झालेले आरोप खेदजनक आहेत. माझी प्रतिमा खराब करण्यासाठी हे आरोप केले जात आहेत. पण, अशा आरोपांमुळे मी डगमगणार नाही, असे पायलट यांनी स्पष्ट केले आहे. तसेच हे आरोप करण्यामागे मोठे षड्यंत्र असून त्यांना अन्य कोणीतरी फूस भरलेली असावी, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

Related Stories

अग्नीपथ योजनेवर माघार नाही

Patil_p

ब्लॅक फंगसवरील इंजेक्शन मिळणार 1,200 रुपयात

Amit Kulkarni

जल्लोष व्हावा, पण जीवाशी खेळ नको!

Patil_p

रिकाम्या खुर्च्यांमुळे सभा न घेताच परतले मोदी

Abhijeet Khandekar

भारतीय सैनिक चुकीने पाकिस्तानात

Amit Kulkarni

केंद्र सरकारकडून ‘ऑफसेट’ पॉलिसी रद्द

datta jadhav
error: Content is protected !!