Tarun Bharat

पायल रोहतगी आणि जीशान खानमध्ये जुंपली

लॉकअप शोमधील चर्चेतील मुद्दा भरकटला

ऑनलाईन टिम / मुंबई

अभिनेत्री कंगना रनौत हीच्या बिनधास्त वक्तव्यामुळे नेहमीच काही ना काही वादाला तोंड फुटलेले आपण पाहिले आहे. पण आता कंगना होस्ट करत असलेल्या लॉकअप या रियालिटी शोमध्येही वादाची ठिणगी पडली आहे. अर्थात हा वाद जरी खुद्द कंगनाने घातला नसला तरी या शोमधल्या दोन स्पर्धक सदस्य एकमेकींना चांगलेच भिडले आहेत. स्पर्धक अभिनेत्री पायल रोहतगी आणि जीशान खान यांच्या मध्ये सुरू असलेल्या एका चर्चेतील मुद्दा भरकटला आणि तो थेट हे दोघे एकमेकींच्या अंगावर धावून जाण्यात झाला. पायलने जिशानला थेट आतंकवादी म्हणताच या शोमधलं ऑनस्क्रीनच नव्हे तर ऑफस्क्रीन वातावरणही ढवळून गेलं.

छोट्या पडद्यावर सध्या चर्चेत असलेल्या लॉकअप या रियालिटी शोमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये काही ना काही ट्वीस्ट येत असतातच. या शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये ऑरेंज टीमच्या मेंबरमध्ये चांगलीच जुंपली. पायल रोहतगी आणि जीशान खान या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या आहेत. शोमधील वेगवेगळ्या टास्कच्यात्ताने या एपिसोडमध्ये चर्चा केली जाते. गेल्या एपिसोडमध्ये ऑस्कर सोहळ्यात विल स्मिथने क्रिस रॉकला मारलेली थप्पड हा चर्चेचा विषय होता. त्याचप्रमाणे या आठवड्यात कर्नाटकामध्ये हलाल मटणावर लादलेले निर्बंध याविषयावर पायल आणि जीशान यांच्यात चर्चा सुरू होती. पण बोलता बोलता दोघांमधील मतभेद इतके टोकाला गेले की पायलने जीशानला इस्लामोफोबिक म्हणत आतंकवादी असल्याचा आरोप केला. इथेच वादाची ठिणगी पडली. गप्प बसेल की जीशान कसला ? पायलने आतंकवादी म्हटल्याने जिशानही पेटून उठला आणि तिनेही पायलवर चांगलेच तोंडसुख घेतलं. त्यानंतर मात्र हा वाद फक्त पायल आणि जीशान यांच्यापुरता मर्यादित राहिला नाही तर या वादात शोमधील अन्य स्पर्धक सदस्यही उतरले आणि त्यांनी पायलला या शोमधून बाहेर काढण्याची मागणी केली. शो सुरु असतानाच पायल आणि जीशान यांच्यातील हा वाद इतका हमरीतुमरीवर गेला की की दोघीही स्पर्धक असल्याचे विसरून एकमेकांशी भांडत होत्या. यात मुनव्वर, निशा, मंदाना ,अंजली, पुनम, आजमा यांनीही जिशानची बाजू घेत पायलवर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर मात्र या शोची होस्ट कंगना रानावत हिला मध्यस्थी करावी लागली. या दोघांच्या वादा मध्ये पडत कंगनाने सूत्र हातात घेतली. कितीही संवेदनशील विषयावर चर्चा सुरू असली तरी वैयक्तिक आरोप करणे योग्य नाही असं सांगत पायलचा कंगनाने चांगलाच समाचार घेतला. शो मधील शिक्षा म्हणून पायल जोपर्यंत शोमध्ये असेल तोपर्यंत तिला कुठल्याही प्रकारची कॅप्टनशीप न देण्याचा निर्णय कंगनाने होस्ट म्हणून घेतला आहे. तर या एपिसोडमध्ये झालेल्या या प्रकारावरून पायलवर येत्या आठवड्यात चार्जशीट लावण्याचे देखील कंगनाने होस्ट म्हणून जाहीर केले. सतत विविध कारणांनी चर्चेत असलेला लॉक अप शो या आठवड्यात मात्र पायल आणि जिशान खान यांच्यामध्ये जुंपलेल्या भांडणाने गाजला.

Related Stories

हार्डी संधूसोबत दिसणार परिणीति

Patil_p

शिवसेनेत बंड, सरकार धोक्यात?

Patil_p

सर्व षडयंत्र शिंदेंच नसून भाजपचं; नितीन देशमुखांचा गौप्यस्फोट

Kalyani Amanagi

सध्याची परिस्थिती सामाजिक आणीबाणीसारखी

Patil_p

पंजाबच्या 10 नवीन मंत्र्यांनी घेतली शपथ

datta jadhav

पार्टी सोडून लव्हबर्डस भटांच्या घरी

Patil_p