Tarun Bharat

पारंपरिकपणे शहर परिसरात गुढीपाडवा साजरा

साडेतीन मुहूर्तावर विशेष खरेदी-नवीन कामांचा शुभारंभ : वाहन-सोने खरेदी तेजीत

प्रतिनिधी / बेळगाव

आरोग्याची गुढी उभारू, कोरोनाला हद्दपार करू

अशा शुभेच्छांची देवाणघेवाण करत परंपरेनुसार घरोघरी गुढी उभारून हिंदू नूतन वर्षारंभाचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा साजरा करण्यात आला. यानिमित्ताने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली. या दिवसापासूनच नवीन शालिवाहन शकाची सुरुवात होते व पंचांग पूजन केले जाते. पौराणिक कथेनुसार शालिवाहन नावाचा कुंभाराचा मुलगा होता. शत्रू त्याला खूप त्रास देत असत. त्यांच्याशी एकटे लढणे शक्मय नसल्याने त्याने मातीचे सैनिक तयार केले व पाणी शिंपडून त्यांच्यात जीव निर्माण केला आणि शत्रूवर विजय मिळविला. तेव्हापासून शालिवाहन शक सुरू झाले, अशी आख्यायिका आहे.

त्याचप्रमाणे श्रीरामांनी विजय मिळविलेला हाच दिवस असेही मानले जाते. गुढी हे प्रगतीचे प्रतीक आहे. त्यामुळे बांबूच्या काठीला कलश बांधून त्यावर शुभ चिन्ह रेखाटून साखरेच्या गाठय़ांची माळ घातली जाते. त्यासोबत रेशमी वस्त्र असते. एकूणच आकाशाच्या दिशेने गुढीचे मुख असते. म्हणजेच प्रगतीची, सौख्याची, आनंदाची गुढी उंच उंच जावो, असे त्यामागे सूचित केले असते.

मोबाईल खरेदीही अधिक

गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक. त्यामुळे या दिवशी विशेष खरेदी किंवा चांगल्या कामांचा संकल्प किंवा शुभारंभ केला जातो. वास्तू किंवा वाहन खरेदी, सुवर्ण खरेदी आवर्जून केली गेली. त्यामुळे सराफी पेढय़ांवर आणि वाहनांच्या शोरूममध्ये गर्दी दिसून आली. अलीकडे यामध्ये मोबाईल खरेदीचीसुद्धा भर पडल्याने तेथेही प्रामुख्याने तरुणाईचा वावर दिसून आला. मंगळवार हा बेळगाव बाजारपेठेचा सुटीचा दिवस. परंतु गुढीपाडवा असल्याने आणि गतवषी कोरोनामुळे खरेदी झाली नसल्याने यंदा बहुसंख्य दुकाने, शोरूम आणि सराफी पेढय़ा खुल्या राहिल्या. त्याचा लाभ ग्राहकांनी घेतला.

याच दिवशी घरी, दुकाने किंवा आस्थापनांमध्ये कोहाळा बांधण्याचा प्रघात आहे. कोहाळा बांधल्याने वाईट नजर त्यावर पडते व आपले घर किंवा दुकान सुरक्षित राहते, अशी भावना आहे. त्यादृष्टीने बाजारपेठेत कोहाळय़ांची आवक प्रचंड प्रमाणात वाढली होती.

गुढीपाडव्यादिवशी पंचांग पूजन करून त्याचे वाचन केले जाते. अर्थातच पंचांगांची खरेदी झाली. कडू आहे ते सर्व गिळून गोडव्याचे स्वागत करावे, या अर्थाने कडुनिंबाची पाने खाऊन सणाची सुरुवात झाली. अर्थातच घरोघरी पक्वान्नांचा बेत रंगला. त्यामुळे श्रीखंड, आम्रखंड, गुलाब जामुन, रसमलाई, बासुंदी, मांडे या पदार्थांना मागणी वाढली. खरेदीसाठी गर्दी झाली असली तरी ज्ये÷ांनी मात्र कोरोनाचे संकट लक्षात घेऊन घरीच राहणे पसंत केले. लहान मुलांनासुद्धा त्यांच्या पालकांनी बाहेर पडण्यास मनाई केली. या पार्श्वभूमीवर दरवषीपेक्षा सोशल मीडियावरून गुढीपाडव्याच्या शुभेच्छांची देवाणघेवाण अधिक प्रमाणात झाली. प्रत्येकानीच

‘प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ दे, कोरोनाचे संकट टळू दे’

अशीच प्रार्थना मानोमन केली.

Related Stories

खानापूर शहर-तालुक्यात दीपावली उत्साहात साजरी

Amit Kulkarni

शहरासभोवतीच्या उपनगरातील रस्त्यावर कचऱयाचे ढिगारे

Patil_p

सीमाप्रश्नाकडे सामाजिक बांधिलकी म्हणून पाहा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Rohit Salunke

पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठी जिल्हय़ात 17 कोटीची तरतूद

Patil_p

संततधार पावसाने शेतकरी हतबल

Patil_p

आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघाची निवड

Patil_p