Tarun Bharat

पारंपरिक खेळण्यांना पोस्टकार्डवर स्थान

सावंतवाडी-छन्नापटना खेळण्यांचा समावेश

प्रतिनिधी/ बेळगाव

पारंपरिक खेळण्यांची माहिती पुढील पिढीपर्यंत समजावी, यासाठी पोस्ट विभागाने पोस्टकार्डवर पारंपरिक खेळण्यांना स्थान दिले आहे. जागतिक पोस्टल दिवस व पोस्टकार्ड देशात येवून 151 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ही नवी पोस्टकार्ड तयार करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या सावंतवाडी येथील लाकडी खेळणी तर कर्नाटकातील छन्नापटना या पारंपरिक खेळण्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे ही पारंपरिक खेळणी आता आपणाला पोस्टकार्डवर पाहता येणार आहेत.

कर्नाटक विभागाच्या मुख्य पोस्ट मास्तर श्रद्धा संपत यांच्या हस्ते बेंगळूर येथे छन्नापटना या खेळण्यांचा फोटो असणाऱया पोस्टकार्डचे अनावरण करण्यात आले. बेळगावसह बेंगळूर, मंगळूर व म्हैसूर या ठिकाणी ही पोस्टकार्डे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. देशातील 12 पारंपरिक खेळण्यांची यामध्ये निवड करण्यात आली आहे. बेळगावपासून जवळ असणाऱया सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

तसेच आंध्रप्रदेश येथील कोंडापल्ली, एटीकोप्पका खेळणी, गुजरात कच्छ येथील लाकडी खेळणी, पश्चिम बंगालची घुरणी, हिमाचली बाहुल्या, ओडिसा येथील जौकंढेई लाख खेळणी, तामिळनाडूची तंजावर खेळणी, तेलंगणाची निर्मल खेळणी व उत्तरप्रदेशची मिर्झापूर बनारसी खेळण्याचा फोटो या पोस्टकार्डवर असणार आहे.

Related Stories

जितो लेडीज विंगतर्फे ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागृती

Patil_p

मुतगा बंदला प्रतिसाद

Amit Kulkarni

मण्णूर गायरान जमिनीत अतिक्रमण

Amit Kulkarni

मॅरेथॉन स्पर्धेत प्रशांत पाटील प्रथम

Amit Kulkarni

लॉकडाऊन महाराष्ट्रात, फटका बेळगावच्या उद्योगाला

Amit Kulkarni

बेळगावचे टॅलेंट तेलगू वाहिनीवर

Patil_p