Tarun Bharat

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी द्या

नेताजी जाधव यांची मागणी : शहापूर गणेशोत्सव महामंडळाची बैठक

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव जिल्हय़ातील कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे. गणेशोत्सवसंदर्भात प्रशासनाने नियमावली जाहीर केली नसल्याने मूर्तिकार, गणेशोत्सव मंडळे संभ्रमात आहेत. प्रशासनाने पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शहापूर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी बैठकीत केली.

साईगणेश सोसायटीच्या सभागृहात रविवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. मंडळांनी खुले देखावे सादर करावेत. यामुळे कोरोना नियमावलीचे पालन करणे सोयीचे होईल, असे यावेळी सांगण्यात आले. बैठकीत राजकुमार बोकडे, माजी नगरसेवक राजू बिर्जे, रमेश सोनटक्की, रणजित हावळाण्णाचे, नितीन जाधव, पी. जे. घाडी, श्रीकांत कदम यांनी विचार मांडले.

यावेळी शांताराम खटावकर, तानाजी शिंदे, गजानन सुतार, रोहित भाकोजी, रोशन शिंदे, मंजुनाथ भोजन्नावर, राजकुमार बोकडे, दिलीप दळवी, अर्जुन देमट्टी, सुधीर कालकुंद्रीकर, अशोक चिंडक, राजाराम सूर्यवंशी, पी. जे. घाडी, हरिलाल चक्हाण, प्रसाद जाधव, राजेश पाटील, सचिन केळवेकर, सूरज कडोलकर, महादेव पाटील, रविंद्र शिगेहळ्ळीकर आदी उपस्थित होते.

शिल्लक मूर्तींना परवानगी आवश्यक

मागील वषी गणेशोत्सवावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे अनेक गणेशमूर्ती शिल्लक राहिल्याने या मूर्तींना प्रशासनाने परवानगी देणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाच्या नियमावलीसाठी मंगळवार दि. 6 रोजी जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

कोरोना पॉझिटिव्ह असूनही कुटुंबासोबत फिरणाऱ्या व्यक्तीला केलं रुग्णालयात दाखल

Archana Banage

शिवसैनिकांची कोगनोळीनजीक पुन्हा अडवणूक

Amit Kulkarni

खानापूर शहर परिसरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

Amit Kulkarni

‘लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी’ लोकसेवेसाठी रुजू

Patil_p

शहापूर विभाग म.ए.समितीची आज बैठक

Patil_p

घरपट्टी वसूलीसाठी मनपाने लपविला आदेश

Patil_p