Tarun Bharat

पारंपरिक समारंभासह अर्थसंकल्प प्रक्रियेस प्रारंभ

Advertisements

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

अर्थसंकल्प दस्तऐवजांच्या संकलनाची प्रक्रिया शनिवारी पारंपरिक हलवा समारंभाच्या आयोजनासह सुरू झाली आहे. या समारंभात अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि अर्थमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी भाग घेतला आहे.

कोरोना महामारीमुळे यंदा नेहमीप्रमाणे अर्थसंकल्पीय दस्तऐवजांची छपाई केली जाणार नाही. याऐवजी यंदा खासदारांना दस्तऐवज डिजिटल स्वरुपात प्रदान केले जाणार आहेत. यापूर्वी दरवर्षी हलवा समारंभाच्या आयोजनापासून अर्थसंकल्पीय दस्तऐवजांची छपाई सुरू होत असे.

एका अभूतपूर्व पुढाकाराच्या अंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने लोकांना मिळणार आहे. अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी मांडला जाणार असल्याचे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. या समारंभावेळी अर्थमंत्री सीतारामन यांनी युनियन बजेट मोबाईल ऍप सादर केला आहे. या ऍपद्वारे खासदार तसेच सर्वसामान्य लोकांना कुठल्याही अडचणीशिवाय डिजिटल स्वरुपात दस्तऐवज प्राप्त होणार आहे.

या मोबाईल ऍपमध्ये वार्षिक वित्तीय विवरण, अनुदान मागण्या, वित्त विधेयक इत्यादीसमवेत घटनेकडून निर्धारित 14 केंद्रीय अर्थसंकल्पीय दस्तऐवज उपलब्ध केले जाणार आहेत. हलवा समारंभात अर्थसचिव अजय भूषण पांड, आर्थिक विषयक सचिव तरुण बजाज, आर्थिकसेवा सचिव देवाशिष पांडा, दीपमचे सचिव तुहिन कांत पांडे,  खर्च सचिव टी.व्ही. सोमनाथन, मुख्य आर्थिक सल्लागार के.वी. सुब्रमण्यन आणि अर्थसंकल्पीय तयारी तसेच संकलनाच्या प्रक्रियेत सामील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या संकलनाच्या स्थितीची समीक्षा करत संबंधित अधिकाऱयांना शुभेच्छा दिल्या आहेत. ऍपमध्ये डाउनलोडिंग, प्रिंटिंग, सर्च, झूम इन, झूम आउट समवेत अनेक वैशिष्टय़े देण्यात आली आहेत.

Related Stories

पंतप्रधानांसह मान्यवरांनी वाढविला लसींवरील विश्वास

Patil_p

विमानतळावर बॉम्ब ठेवणाऱया आरोपीला अटक

Patil_p

काँग्रेसचे संजय झा कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

उपचारातील रुग्णसंख्येत झपाटय़ाने घट

Omkar B

उत्तराखंड सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला ‘हा’ निर्णय

Tousif Mujawar

शहिदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 36 लाखांची मदत; बिहार सरकारची घोषणा

datta jadhav
error: Content is protected !!