Tarun Bharat

पारगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा

वार्ताहर / कार्वे

मजरे कार्वे येथील शहीद जवान वेल्फेअर फाउंडेशन, शिवनेरी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व पारगड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षी साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी राज्य शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून, सामाजिक अंतर राखून, मास्क व सॅनिटायझर चा वापर करून मोजक्या शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांचा, जिजाऊ मासाहेबांचा, व धर्मवीर संभाजीराजे यांचा जयजयकार करत हा सोहळा साजरा केला.
 मजरे कार्वे येथे दरवर्षी या शिवराज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर पाच जून रोजी पालखी सोहळा, मिरवणूक काढली जाते.

सायंकाळी मुक्कामास शिवभक्त पारगडावर जातात. गडाची स्वच्छता, मंदिराची स्वच्छता केली जाते. या सर्व गोष्टींना यावेळी फाटा देण्यात आला. सहा जून रोजी पहाटे मजरे कार्वे हुन काही निवडक शिवभक्त पारगडकडे रवाना झाले. गडाच्या पायऱ्यांची पूजा ग्रामपंचायत सदस्य दिलीप परीट यांच्या हस्ते करण्यात आली.

दै. तरुण भारतचे पत्रकार व उपसरपंच निवृत्ती हारकारे व पत्रकार नारायण गडकरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. ग्रा. पं. सदस्य पांडुरंग बेनके, व प्रकाश चिरमुरे यांच्या हस्ते शिवमूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. दरवर्षी होणारे शस्त्रास्त्र प्रात्यक्षिके, गोंधळ, भजन, पोवाडे हे सर्व कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आले. शिवचरित्राचे गाढे अभ्यासक पराग निट्टुरकर यांनी कवी कलश व कवी भूषण यांच्या संस्कृत श्लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मानवंदना दिली. देवी भवानी च्या मंदिरात कोरोना महामारी तुन जनतेला सुखरूप बाहेर पडू दे व पुढील शिवराज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी आशीर्वाद दे. असे साकडे घालण्यात आले. भवानीमातेच्या मंदिरात आरती करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या संचारबंदी, कलम १४४ व सामाजिक अंतर या सर्व नियमांचे पालन करून अगदी मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न करण्यात आला. यावेळी गोविंद कांबळे, सुरज हारकारे, दिलीप कदम, रघुनाथ गावडे, सचिन मालुसरे, संजय जाधव उपस्थित होते.

Related Stories

उद्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनचा अंतिम निर्णय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Tousif Mujawar

गोकुळ निवडणूक : दोन्ही आघाडीतील उमेदवारांना छाननीची धास्ती

Archana Banage

भारतीय हद्दीत चीननं वसवलेलं गाव आधी उखडा…

datta jadhav

वादग्रस्त वक्तव्याबद्दल चंद्रकांत पाटलांची जाहीर माफी

datta jadhav

सोलापुरात बुधवारी नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्ण

Archana Banage

फडणवीसांच्या सागर बंगल्यावर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; नेत्यांची बोलावली बैठक

Archana Banage