Tarun Bharat

पारगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

खानापूर / प्रतिनिधी

आरोग्य सांभाळणे हे सध्याच्या काळात महत्त्वाचे आहे. आणि म्हणून केंद्र सरकारने फिट भारत अभियान राबविले आहे. शिवरायांच्या मावळय़ांनी गडकोट आणि किल्ले बांधले. कारण मावळे प्रचंड तंदुरुस्त होते. आणि आज हेच किल्ले चढताना आम्हा तरुणांना धापा लागतात. या किल्ल्यांचे संवर्धन आणि संरक्षण महत्त्वाचे आहेच. आणि त्याचबरोबर तरुणांचे आरोग्य देखील महत्त्वाचे आहे. आपल्या आरोग्यासाठी आणि आपले सामर्थ्य जाणून घेण्यासाठी तरुणांनी नियमित शिवरायांचे गडकिल्ले चढले पाहिजेत, असे प्रतिपादन ऍड. शिवाजी देसाई यांनी केले. कोल्हापूर जिल्हय़ातील चंदगड तालुक्मयात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पारगड किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सव आणि स्वच्छता अभियान या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ते पुढे म्हणाले, †िशवरायांकडे अगदी लहानपणापासून प्रचंड दूरदृष्टी होती. एक सुनियोजित योजना आखून स्वराज्य निर्मितीची योजना तयार करण्यात आली होती. शिवरायांनी अडचणींचा बाऊ न करता त्यावर मात केली.

आपण जरी परक्मयाच्या ठिकाणी चाकरी करत असलो तरी आपल्या मुलाने तशी चाकरी करता कामा नये. तर उलट त्यांने आपले स्वतंत्र अस्तित्व कितीही संकटे आली तरी निर्माण केले पाहिजे, अशी धारणा शिवरायांच्या आई-वडिलांची होती.

शिवरायांनी केवळ स्वराज्यच निर्माण केले नाही, तर एक आदर्श राजा कसा असावा, याचा परिपाठ सर्व जगाला घालून दिला आहे. आज केवळ शिवराय जाणण्याचीच गरज नसून त्यांचे विचार आपण जीवनात प्रत्यक्ष उतरविण्याची गरज आहे. त्यासाठी आईच्या उदरात असतानाच मुलावर शिवरायांच्या विचारांचे संस्कार व्हायला हवेत.

आपल्या माता-भगिनी सक्षम बनल्या तरच जन्माला येणारी मुले देखील सक्षम बनतील. स्वराज्य निर्माण करताना शिवरायांनी आपल्याला हेच सांगितले आहे की, प्रत्येक माणसामध्ये सामर्थ्य असते आणि ते फक्त जागविण्याची आणि त्याला चांगला आकार देण्याची आवश्यकता आहे.

युवकांनी घरात बसून न राहता शिवरायांचे गडकिल्ले पादाक्रांत केले पाहिजे. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 पारगड किल्ल्यावरील स्वच्छता मोहीम तसेच दीपोत्सव कार्यक्रमासाठी खानापूर तालुक्यातील अनगडी गावचे रहिवासी व पोलीस अधिकारी जयवंत पाटील यांनी पुढाकार घेतला होता. यासाठी त्यांनी आपल्या गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मित्रमंडळीचे सहकार्य घेतले होते. व याकामी त्यांना इतिहासकार सदानंद गावडे, राजाराम पाटील आदी मान्यवरांची मोलाची साथ लाभली.

यावेळी बोलताना मोहीमेचे प्रमुख जयवंत पाटील म्हणाले, बेळगाव हा महाराष्ट्राचाच भाग आहे. आणि त्याला ऐतिहासिक वारसा आहे. बेळगाव-महाराष्ट्रात येण्यासाठी आता एक मोठे आंदोलन आपल्याला उभारावे लागेल. इतिहासकार सदानंद गावडे म्हणाले, चंदगड तालुक्याला प्रचंड मोठा ऐतिहासिक वारसा आहे. इथे अनेक गडकिल्ले आहेत. चंदगड तालुक्याचा इतिहास तरुणांनी जाणला पाहिजे, यावेळी युवकांनी छत्रपती शिवरायांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

Related Stories

के. आर. शेट्टी, अॅक्सेस सीसीआय संघ विजयी

Amit Kulkarni

डोळय़ांची काळजी घेणे गरजेचे

Amit Kulkarni

मनपाच्या महसूल कर्मचाऱ्यांना चेकपोस्टवर ड्युटी

Amit Kulkarni

विनामास्क फिरणाऱयांकडून चार लाखाचा दंड वसूल

Patil_p

बसमध्ये चढताना विद्यार्थी-वृद्ध जखमी

Amit Kulkarni

दहावीच्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण

Tousif Mujawar