Tarun Bharat

पारदर्शक स्मार्ट टीव्ही शाओमीकडून सादर

Advertisements

जगातील पहिला टीव्ही : 16ऑगस्टपासून विक्रीस प्रारंभ

वृत्तसंस्था/ बीजिंग

शाओमी कंपनीची ओळख ही जगात विविध आश्चर्यकारक उत्पादने बाजारात आणणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. यात इलेक्ट्रिक टूथब्रश, सफाईच्या झाडूसह अन्य उत्पादने आहेत. सध्या कंपनीने ट्रान्सपरंट स्मार्ट टीव्ही ‘एमआय टीव्ही एलयुक्स ओलीइडी’सादर केला आहे.

सदरचा टीव्ही 55 इंचाच्या आकाराचा असून ट्रान्सपरंट ओलीइडी पॅनेल आणि 120 एचझेडसह येणार आहे. सध्या हा टीव्ही चीनमध्येच सादर करण्यात येणार आहे. याटीव्हीची किंमत लाखात आहे. भारतीय रुपयाच्या हिशोबाने चीनमध्ये या टीव्हीची किमत 5.37 लाख रुपये असून टीव्हीची विक्री 16 ऑगस्टपासून सुरु होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

काय आहेत फिचर्स

शाओमीने या नवीन टीव्हीमध्ये मीडियाटेक 9650 प्रोसेसरसोबत एआय मास्टर इंजिन दिले आहे. तसेच दमदार आवाजासोबत यामध्ये एआय मास्टर आणि डॉल्बी ऍटमॉस सपोर्टचीही सुविधा दिलेली आहे. ओएस संदर्भात विचार केल्यास टीव्ही विशेष करुन कस्टमाइज्ड एमआययुआय यावरती काम करत आहे. याचे होमपेज हे सेटिंग्स, माय ऍप यांना विशेष पद्धतीने डिझाइन केले आहे. कारण पारदर्शक स्क्रीनची गुणवत्ता अगदी स्पष्ट दिसण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे.

Related Stories

सेन्सेक्स प्रभावीत ; निफ्टी किंचीत तेजीत

Patil_p

महामारीमुळे जागतिक पर्यटन क्षेत्र नुकसानीत : संयुक्त राष्ट्र संघ

Patil_p

गोएअरचा लवकरच येणार आयपीओ

Patil_p

अर्बन कंपनी 1,857 कोटी रुपये उभारणार

Patil_p

चढउताराच्या प्रवासानंतर बाजार बंद

Patil_p

फोन निर्मात्यांनी मागितला वर्षाचा कालावधी

Patil_p
error: Content is protected !!