Tarun Bharat

पार्किंग वादातून दोघांवर चाकू हल्ला

सावंतवाडीत पितापुत्रावर गुन्हा दाखल : दोन दिवस कोठडी

सावंतवाडी:

मोटारसायकल पार्क करण्याच्या वादातून दोघांमध्ये झालेले भांडण सोडविण्यास गेलेल्या दोन तरुणांवर चाकूने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मच्छीमार्केटजवळ भरवस्तीत घडली. या हल्ल्यात चेतन पुरुषोत्तम देऊलकर (29) आणि संतोष वागळे हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी तेथील महेश कृष्णा दाभोलकर (49) व कुशल महेश दाभोलकर (23) या पितापुत्रावर  गुन्हा दाखल करून अटक केली. त्यांना सोमवारी सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 11 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

तक्रारदार चेतन देऊलकर यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारदार आणि संशयित महेश दाभोलकर व कुशल दाभोलकर हे शेजारी-शेजारी राहतात. रविवारी रात्री घराच्या वाटेवर मोटारसायकल पार्क केल्यावरून वाद होऊन दोघात भांडण सुरू झाले. हे भांडण सोडविण्यासाठी चेतन देऊलकर व संतोष वागळे गेले असता त्यांना संशयितांनी धक्काबुक्की व शिवीगाळ केली. त्यावेळी महेश दाभोलकर याने आपल्या हातातील चाकूने चेतन देऊलकर यांच्या छातीच्या डाव्या बाजूला तर संतोष वागळे यांच्या नाकावर वार करून गंभीर जखमी केले. तसेच घरातील दोन महिलांनाही धक्काबुक्की करून दुखापत व शिवीगाळ केली. जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक तौसिफ सय्यद यांच्यासह हवालदार महेश जाधव, प्रसाद कदम, दीपक लोंढे यांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले. जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.

याप्रकरणी जखमी चेतन देऊलकर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महेश दाभोलकर, कुशल दाभोलकर यांच्याविरुद्ध भादंवि कलम 326, 324, 323, 504 (34) अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. सरकार पक्षातर्फे ऍड. स्वप्नील कोलगावकर यांनी अधिक तपासासाठी व गुन्हय़ात वापरलेला दगड हस्तगत करणे व हल्ला करण्यामागचा हेतू काय, यासाठी न्यायालयाने दोघांनाही पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने या दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. 

Related Stories

बाळा नांदगावकरांच्या मनसे पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या

Anuja Kudatarkar

सीव्ह्यू गॅलरीतून अथांग समुद्र दर्शनाचा आज होणार अस्त!

Patil_p

राज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी

Abhijeet Khandekar

बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांची परस्पर विक्री केल्याचा प्रकार

Patil_p

बडतर्फ एसटी कर्मचाऱयांची संख्या 134 वर!

Patil_p

आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करा!

NIKHIL_N
error: Content is protected !!