Tarun Bharat

पार्किंग शुल्क वसुलीसाठी मनपा काढणार चार निविदा

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

महापालिकेने पार्किंग शुल्क आकारणीसाठी निविदा मागविली होती. पण याला प्रतिसाद मिळाला नसल्याने शुल्क वसुलीची जबाबदारी मनपा कर्मचाऱयांवरच वाढली आहे. त्यामुळे चार ठिकाणाच्या पार्किंगतळावर शुल्क वसुलीसाठी चार वेगवेगळय़ा निविदा मागविण्याचा विचार महापालिकेच्या महसूल विभागाने चालविला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

बापट गल्ली आणि जिल्हा रुग्णालयासमोर चारचाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱयांकरवी शुल्क आकारणी करण्यात येते. पण ही जबाबदारी खासगी कंत्राटदारावर सोपविण्यासाठी शुल्क आकारणीकरिता महापालिकेने निविदा काढल्या होत्या. यामध्ये आणखीन दोन पार्किंगतळांचा समावेश करण्यात आला आहे. बापट गल्ली, खंजर गल्ली, जिल्हा रुग्णालयासमोरील जागा आणि आरएलएस कॉलेज समोरील खुल्या जागेचा समावेश होता. खंजर गल्ली येथील पार्किंगतळ सुरू करण्यासाठी प्रथमच निविदा मागविण्यात आली होती. याकरिता महापालिकेने प्रतिवर्षाला 16 लाख रुपये रक्कम निश्चित केली आहे. पण या ठिकाणी प्रथमच पार्किंगतळ सुरू करण्यात येणार असल्याने नागरिकांकडून प्रतिसाद मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांनी भाग घेतला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. खंजर गल्ली पार्किंगतळाच्या माध्यमातून इतकी रक्कम जमा होणार नाही, अशी भीती कंत्राटदारांना आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेत कोणीच बोली लावली नसल्याने निविदा प्रक्रिया बारगळली आहे.

पार्किंग शुल्कच्या रकमेपेक्षा कर्मचाऱयांचा पगार जास्त

सध्या दोन ठिकाणच्या पार्किंग शुल्कची वसुली मनपा कर्मचाऱयांकरवी करण्यात येते. दोन सत्रात कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आल्याने सहा कर्मचारी अडकून राहत आहेत. त्यामुळे पार्किंग शुल्कच्या रकमेपेक्षा कर्मचाऱयांचा पगार जास्त होत आहे. त्यामुळे पार्किंग शुल्क वसुलीसाठी कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी पार्किंग शुल्कची जबाबदारी मनपा कर्मचाऱयांवरच पडली आहे.

कर्मचारी अडकून राहत असल्याने चार  ठिकाणाच्या शुल्क वसुलीसाठी वेगवेगळय़ा निविदा मागविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. बापट गल्ली, खंजर गल्ली, जिल्हा रुग्णालयासमोरील जागा, आरएलएससमोरील जागेतील पार्किंग शुल्क वसुलीकरिता वेगळी रक्कम निश्चित करून निविदा मागविण्याचा विचार महापालिकेच्या महसूल विभागाने चालविला आहे. 

Related Stories

लोकमान्यची रौप्यमहोत्सवी वार्षिक सभा संपन्न

Patil_p

वेदांत सोसायटीतर्फे राजेशकुमार मौर्य यांचा सत्कार

Amit Kulkarni

विजयनगर परिसरात मनोज पावशे यांच्यावतीने औषध वितरण

Patil_p

अनेक कलाकारांची रसना तृप्त करणारा अवलिया

Omkar B

‘अवघा रंग एक झाला’ कार्यक्रम 20 रोजी

Rohan_P

घरातून बाहेर पडताच खड्डय़ात पडण्याची वेळ!

Omkar B
error: Content is protected !!