Tarun Bharat

पालकमंत्री उदय सामंत कोरोना पॉझिटिव्ह

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या दहा दिवसांपासून ते विलगीकरणात आहेत. सामंत यांनी स्वत: ट्वीट करून आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. पुढील आठवडय़ात जनतेच्या सेवेत पूर्ववत रुजू होणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्र्यांनी म्हटलं आहे की, ‘गेले दहा दिवस स्वतः विलगीकरणात आहे. कोरोनाची काही लक्षणे आढळल्याने मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली व रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आपण गेल्या दहा दिवसांत कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्मयता अगदी कमी आहे. तरीही आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, मी ठणठणीत आहे. पुढच्या आठवडय़ात जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री सामंत हे नागपूरहून विमानाने येताना राज्यमंत्री बच्चू कडू हे त्यांच्यासोबत होते. त्यानंतर बच्चू कडू हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे सामंत खबरदारी म्हणून ‘सेल्फ क्वारंटाईन’ झाले होते. ogon.php

Related Stories

बाग-बगीचे उद्याने विकसित करण्यासाठी बाळा धाऊसकर यांनी वेधले पाटबंधारेचे लक्ष

NIKHIL_N

नाणार सोडून कुठेही रिफायनरी होऊ शकते!

Patil_p

तब्बल 14 वर्षांनंतर प्रकल्पग्रस्ताचे घर प्रकाशमय

NIKHIL_N

अजिंक्य गवस यांना ”युवा कला गौरव” राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Anuja Kudatarkar

‘फिट इंडिया’त रत्नागिरी जिल्हय़ाचा चौथा नंबर!

Patil_p

होम क्वारंटाईन केलेल्या प्रौढाचा ह्दयविकाराच्या धक्याने मृत्यू

Patil_p