बेळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री व बेळगावचे पालकमंत्री गोविंद कारजोळ हे मंगळवार दि. 22 जून रोजी बेळगाव दौऱयावर येत आहेत. दुपारी 2 वाजता त्यांचे बेळगाव येथे आगमन होणार आहे. दुपारी 4 वा. पावसामुळे संकटात सापडलेल्या वेगवेगळय़ा विभागात केलेल्या उपाययोजनांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर कोरोना नियंत्रणासाठी राबविलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱयांची बैठक घेणार आहेत. मंगळवारी रात्री बेळगाव येथे वास्तव्य असणार आहे. बुधवार 23 रोजी सकाळी 11.30 वा. सरकारी प्रथम दर्जा कॉलेजमधील दहा विद्यार्थ्यांना टॅब वितरण कार्यक्रमाला चालना देणार आहेत. बेंगळूर येथील विधानसौधमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सांकेतिकरित्या उद्घाटन होणार आहे. दुपारी 12.30 वा. चिकोडी परिसरात पावसामुळे झालेल्या परिस्थितीची पाहणी करणार असून सायंकाळी मुधोळला रवाना होणार आहेत.


previous post
next post