Tarun Bharat

पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून डॉ. भारत पाटणकर यांचे सांत्वन

वार्ताहर / कासेगाव

आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विचारवंत डॉ. गेल ऑम्वेट तथा शलाका पाटणकर यांचे नुकतेच निधन झाले. याबद्दल पालक मंत्री जयंत पाटील यांनी कासेगाव येथील त्यांच्या घरी जाऊन त्यांचे पती डॉ. भारत पाटणकर व कन्या प्राची यांची भेट घेऊन सांत्वन केले.

डॉ. गेल आणि डॉ. भारत यांनी आपल्या निरामय आणि तितक्याच निर्भीड सहजीवनातून सावित्री जोतिबांचा वारसा पुढे नेत पुढच्या पिढीसाठी एक नवा आदर्श घालून दिला आहे. अशा शब्दांत जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, आटपाडीचे भारत पाटील अरुण कांबळे आदी उपस्थित होते.

Related Stories

सांगलीच्या जिल्हाधिकारी पदावर डॉ. राजा दयानिधी रूजू

Abhijeet Khandekar

सांगली शहरात लव्हली सर्कल जवळ तरुणाचा खून

Abhijeet Khandekar

सांगली : मिरज पश्चिम भागातील पूरग्रस्तांचा एल्गार; तात्काळ मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

Archana Banage

म्हैसाळ बंधाऱ्यावर सापडला अनिल पाटील – सावर्डेकरांचा मृतदेह

Archana Banage

तहानलेल्या माकडाची पाण्यासाठी भटकंती

Archana Banage

सांगली : खानापूरला शिवाजी विद्यापीठचे उपकेंद्र का नको?

Archana Banage