Tarun Bharat

पालकमंत्री दत्तात्रय भरणे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर; कोरोना आढावा बैठक घेणार

Advertisements

पंढरपूरसह , अक्कलकोटला दौरा, कोरोना आढावा बैठक घेणार

सोलापूर/प्रतिनिधी

राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे उद्या दि. 19 रोजी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून शहरासह पंढरपूर अक्कलकोट या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना संदर्भात बैठक घेणार आहेत.

पालकमंत्री भरणे सकाळी साडे 11:30 वाजता  पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा बैठक घेणार आहेत. दुपारी पावणे एक वाजता सोलापुरातील सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात त्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी चार वाजता पालकमंत्री भरणे अक्कलकोट कडे रवाना होणार आहेत. अक्कलकोट पंचायत समितीच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता आढावा बैठक घेणार आहेत. सायंकाळी सहा वाजता अक्कलकोट येथून ते इंदापूरकडे रवाना होणार आहेत. 

Related Stories

कोरोनातील अनाथांसाठी ‘राष्ट्रवादी जीवलग’ योजना; सुप्रिया सुळेंची घोषणा

Abhijeet Shinde

पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांसी ‘जय महाराष्ट्र’, रामदास कदमांनीही साथ सोडली

Rahul Gadkar

अनिल देशमुखांच्या चौकशीसाठी सीबीआयची टीम आज मुंबईत येणार

Abhijeet Shinde

माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे वृद्धापकाळाने निधन

Abhijeet Shinde

सोलापूर : माढा तालुक्यात ७० कोरोना रुग्णांची वाढ

Abhijeet Shinde

सोलापूर : इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही कोरोना लस मोफत द्या- ॲड रेवण भोसले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!