Tarun Bharat

पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्यापासून तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर

Advertisements

लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी करणार चर्चा


सोलापूर \ प्रतिनिधी

 शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबतचा आढावा घेण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्या शुक्रवारपासून तीन दिवस सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आढावा बैठका घेणार आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात सर्वत्र लागू होती. कोविडबाबत बैठका घेण्यावर आणि उपाययोजनांचे निर्णय घेण्याबाबत अडचण निर्माण होत होती. त्यामुळे पालकमंत्री भरणे यांच्या कार्यालयाकडून मतदान झाल्यानंतर कोविड बाबत बैठका घेण्यास, उपाययोजना करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आली होती. या विनंतीचा विचार करून  भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास अशा बैठका घेण्यास परवानगी देणारे पत्र पाठवले आहे.

यानुसार पालकमंत्री भरणे उद्या, शुक्रवारपासून जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची पुढीलप्रमाणे आढावा बैठका घेणार आहेत.

असा असणार दौरा

23 एप्रिल- सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह, अकलूज. दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह, पंढरपूर. दुपारी 3 वाजता तहसील कार्यालय, मंगळवेढा. सांयकाळी 6 वाजता पंचायत समिती सांगोला.
 24 एप्रिल- सकाळी 9 वाजता पंचायत समिती, करमाळा. दुपारी 12 वाजता पंचायत समिती कुर्डूवाडी. दुपारी 3 वाजता नगरपालिका, बार्शी. सांयकाळी 6 वाजता पंचायत समिती, मोहोळ.
25 एप्रिल – सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय, अक्कलकोट. दुपारी 2 वाजता नियोजन भवन सोलापूर.  

Related Stories

चंद्रदर्शन झाल्यानंतरच रमजान ईद

Archana Banage

सोलापूर जिल्ह्यात सहा हजार बाधित रुग्ण ; 2,810 जण ठणठणीत

Archana Banage

कुरुल विजापूर रस्त्यालगत अपघात, जीवित हानी टळली

Archana Banage

वंचित बहुजन आघाडी बार्शीतील सर्व ग्रामपंचायत लढवणार

Archana Banage

सोलापूर ग्रामीण भागातील होम आयसोलेशन होणार बंद

Archana Banage

सोलापूर : आरोग्य विभागात ३८२४ पदांची हंगामी भरती

Archana Banage
error: Content is protected !!