Tarun Bharat

पालखीत बसून मतदानास जाणार गरोदर महिला

Advertisements

उत्तराखंडमध्ये पाचव्यांदा विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच दिव्यांग आणि गरोदर महिला डोली आणि डंडी-कंडीत (एकप्रकारची पालखी) बसून स्वतःचे लोकप्रतिनिधी निवडणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ही व्यवस्था केली जात आहे. सीमावर्ती जिल्हा उत्तरकाशीमधील मोरी, भटवाडी तसेच नौगांव येथील मतदानकेंद्रांवर मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान असते.

हिमवृष्टीमुळे बहुतांश मतदार असुविधांपोटी मतदान केंद्रांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. यात दिव्यांग आणि गरोदर महिलांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविणे आव्हानात्मक असते. परंतु यंदा असे घडणार नाही. प्रशासन त्यांना स्वतः मतदान केंद्रांपर्यंत आणणार आहे. याकरता विशेष प्रकारच्या पालखीची व्यवस्था केली जात आहे.  आरोग्याच्या कारणास्तव मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्यास असमर्थ असलेल्या मतदारांची ओळख पटविली जात आहे.

तसेच जिल्हय़ातील सर्व गरोदर महिलांचीही यादी तयार करण्यात आली आहे. अशा महिला आणि दिव्यांग मतदाराला जर मतदान केंद्रांपर्यंत पोहोचता येत नसल्यास प्रशासनाकडून डोलीची व्यवस्था केली जात आहे.

Related Stories

सिंघू बॉर्डरवर आढळला बॅरिकेड्सला बांधलेला मृतदेह

Patil_p

हार्दिक पटेल यांचा हायकमांडवर हल्लाबोल

Patil_p

“कंगनाच्या गालापेक्षाही जास्त सुंदर रस्ते बनवू”

Sumit Tambekar

ओमिक्रॉनचा धोका : आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

datta jadhav

पावसाळी अधिवेशनात केवळ 18 तासांचे कामकाज

Patil_p

31 मार्चपासून देश होणार निर्बंधमुक्त

datta jadhav
error: Content is protected !!