Tarun Bharat

पालगडात महिलेचे दागिने हिसकावणाऱयाला अटक

वार्ताहर/ मौजेदापोली

 दापोली तालुक्यातील पालगड येथे महिलेला धमकावून तिच्याकडील दागिने हिसकूवन पळणाऱया संशयिताला पोलिसांनी अटक केल़ी ही घटना 6 मार्च रोजी पोलगड पवारवाडी येथे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली होत़ी अटक करण्यात आलेला चोरटा हा 15 वर्षीय बालक आह़े घटनेच्या केवळ 24 तासांत पोलिसांनी या चोरीचा छडा लावत आरोपिला अटक केल़ी

   पालगड येथील सविता शांताराम जोंधळे (50, ऱा पालगड पवारवाडी) यांनी याप्रकरणी दापोली पोलिसांत तक्रार दाखल केली होत़ी त्यानुसार जोधळे या शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास जोशी बंगला येथे झाडांना पाणी देत होत्य़ा  यावेळी परिसरातील कुपनलिकेची कोणीतरी अनोळखी व्यक्ती वायर कटिंग करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्यास काय करतोस असे हटकले असता त्याने रस्त्यावर सुरू असलेल्या जिओ पोलकरिता आर्थिंग घेत असल्याचे सांगितल़े 

     यावेळी आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा उठवत आरोपीत याने जोंधळे यांच्याशी झटापट करण्यास सुरूवात केल़ी चोरटय़ाने जोंधळे यांना मारहाण करून  त्यांच्या कानातील दीड ग्रॅमची कुडी व गळ्यातील साडेपंधरा ग्रॅमची सोन्याची साखळी असा मिळून 49 हजाराचा मुद्देमाल हिसकावून पोबारा केला. ही घटना घडल्यानंतर जोंधळे यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले व त्यांनी चोरास शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला. याप्रकरणी दापोली पोलिसांत अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा

   पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या शोधमोहिमेत दापोली येथे टपरीवर जोधळे यांनी वर्णन केलेला चोरटा दिसून आल़ा त्याला ताब्यात घेवून चौकशी करण्यात आली असता त्याने आपला गुन्हा पोलिसांपुढे कबूल केल़ा सदरची कारवाई दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक पूजा हिरेमठ, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक गायकवाड, दीपक गोरे, मोहन कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल सागर कांबळे, सुनिल पाटील, रमेश जडय़ार, निलम देशमुख, यांनी केल़ी

Related Stories

रत्नागिरी : दापोली पोलिसांनी उघड केले बंदूक विक्रीचे मोठे रॅकेट

Archana Banage

लाचप्रकरणी तत्कालीन भरणे ग्रामसेवकाचे निलंबन

Patil_p

शंभरहून अधिक घरांतील गणपती यंदा मुंबईत

NIKHIL_N

राजापूर पंचायत समिती सभापती लाड यांचा राजीनामा

Archana Banage

प. पू. मौनी महाराज अनंतात विलीन

Anuja Kudatarkar

आचऱयात कारने तिघांना उडवले

NIKHIL_N