Tarun Bharat

पालगडावर सापडले तब्बल 22 तोफगोळे

Advertisements

मनोज पवार/ दापोली

तालुक्यातील पालगड किल्ल्यावर शिवजयंतीच्या आदल्या दिवशी शिवप्रेमी झेंडा लावण्यासाठी खड्डा खणत असताना तब्बल 22 तोफगोळे शिवप्रेमींना सापडले आहेत. यामुळे शिवअभ्यासकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. किल्ल्यावर आणखी काही ऐतिहासिक वस्तू सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 पालगड येथील झोलाई स्पोर्टस्कडून दरवर्षी शिवजयंती उत्सव पालगड व घेरापालगड या दोन गावांमध्ये असलेल्या ऐतिहासिक पालगड किल्ल्यावर साजरा केला जातो. यावर्षीसुद्धा उत्सव साजरा करण्यासाठी पूर्वतयारी करण्यासाठी झोलाई स्पोर्टस्चे सभासद किल्ल्यावर गेले होते. शिवजयंतीच्या आदल्या दिवशी किल्ल्यावर झेंडे लावण्यासाठी सभासद अक्षय दाबेकर खड्डा खणत असताना त्याला एक कठीण वस्तू सापडली. ती त्याने खड्डय़ातून बाहेर काढली असता तो तोफेचा गोळा असल्याचे निदर्शनास आले. यानंतर झोलाई स्पोर्टस्चे अध्यक्ष सुशांत पवार, सचिव श्रीराम पाटील, खजिनदार निखिल पाटणे, माजी अध्यक्ष सुयोग वाजे व सर्व सभासदांनी तेथे आणखी खोदण्याचा निर्णय घेतला. तिथे आणखी थोडी खोदाई केले असता तब्बल 22 तोफगोळे त्याच ठिकाणी मिळाले.

   खोदाईमध्ये आढळलेले तोफगोळे शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर ठेवून शिवजयंती उत्सवाच्या दिवशी या तोफगोळ्यांची पूजा करण्यात आली. या तोफगोळ्याबाबत पुरातत्व विभागाला कळवण्यात आले आहे. त्यांच्याकडून येणाऱया सूचनांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. हे तोफेचे गोळे कमालीचे जड असल्याने त्यांच्या वाहतुकीचा प्रश्न मंडळाच्या सदस्यांसमोर आहे. त्यांनी सध्या हे सर्व तोफगोळे एका पेटीमध्ये ठेवले आहेत. ते पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची  गर्दी उसळत आहे.

Related Stories

अंगणवाडी सेविका विनंती शेडगे यांचे निधन

Ganeshprasad Gogate

सावंतवाडीत दिव्यांग बांधवांसाठी मोफत कार्यशाळा व जनजागृती मोहिमेचे आयोजन

Ganeshprasad Gogate

‘पॉझिटिव्ह’ची संख्या 99 वरून 113 वर

NIKHIL_N

मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाच्या सावंतवाडी शाखेकडून निषेध

Ganeshprasad Gogate

मित्रांसमवेत नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

Ganeshprasad Gogate

मुंबईस्थित ओटवणे ग्रामस्थ मंडळाचा गावातील पूरग्रस्तांना मदतीचा हात

NIKHIL_N
error: Content is protected !!