ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
महाराष्ट्रातील पालघर येथे दोन साधूंच्या हत्येच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. साधुंच्या हत्या प्रकरणी सीबीआय किंवा एनआयएमार्फत ही चौकशी करण्यात यावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेनंतर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. याची पुढील सुनावणी जुलैमध्ये होणार आहे.
लॉक डाऊनच्या काळात दोन साधूंची जमावांनी हत्या केली होती. या प्रकरणी 115 जणांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे.


दरम्यान, गुरुवारी या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी झाली. या दरम्यान, राज्य सरकार कडून या याचिकेला विरोध करण्यात आला.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात 1 मे रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्यात न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना तपासाचा सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.