Tarun Bharat

पालघर हत्याकांड : पीडितांची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा अपघातात मृत्यू

ऑनलाईन टीम / पालघर :

पालघरच्या गडचिंचलेमध्ये झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणी डहाणू न्यायालयात पीडितांची बाजू मांडण्यासाठी निघालेले वकील दिग्विजय त्रिवेदी यांचा मेंढवणच्या खिंडीत अपघाती मृत्यू झाला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या साधूंच्या पक्षात विश्व हिंदु परिषदेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी वकील दिग्विजय त्रिवेदी हे सकाळी 10 च्या सुमारास जात असताना अपघात झाला. त्रिवेदी हे कारमधून येत असताना कार वरील ताबा सुटला व ती रस्त्याच्या कडेला उलटली. 


दरम्यान, गडचिंचले हत्या प्रकरणी आता आरोपींची संख्या 141 झाली आहे. गुरुवारी सहा आरोपींना न्यायालयाने 19 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आधीच अटकेत असलेल्या 106 जणांपैकी पाच जणांना 16 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली. तर अन्य 101 जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. तर त्यातील 40 जणांना तिसऱ्या गुन्ह्यात अटक केली असून त्यांना देखील 18 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. 

Related Stories

अजित पवार यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, काही निष्पन्न होणार नाही

Archana Banage

महाराष्ट्रात आजपासून कोरोना लसीकरण

Tousif Mujawar

तौक्ते चक्रीवादळ मंदावले; पण मुंबईत आजही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

Tousif Mujawar

दक्षिण आफ्रिकेत पुराचा कहर, जनजीवन विस्कळीत

Archana Banage

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून 8 ठार

Patil_p

…हे देश म्हणजे सडलेले सफरचंद

datta jadhav