Tarun Bharat

पालिका कर्मचाऱयांच्या चाळीला येणार चांगले दिवस

प्रतिनिधी/ सातारा

सातारा नगरपालिकेच्या कर्मचाऱयांसाठी सदरबाजार येथील लक्ष्मी टेकडी येथे चाळ आहे. या चाळीत पालिका कर्मचारी राहतात. परंतु काही खोल्यांमध्ये पालिका कर्मचाऱयांचा काही संबंध नाही असेही कुटुंबिय राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतेच पालिका कर्मचाऱयांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे मागणी केल्यानुसार त्यांनी पालिका कर्मचाऱयांच्या चाळीच्या नुतनीकरणासाठी 8 लाख 29 हजार रुपयांची तरतुद केलेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पालिका कर्मचाऱयांना चाळ चांगल्या स्थितीत पहायला मिळणार आहे. दरम्यान, जे पालिका कर्मचारी नसूनही चाळीत राहिलेले आहेत त्यांची हकालपट्टी होणार आहे, असेही सांगण्यात येत आहे.

सातारा पालिकेत आरोग्य, पाणी पुरवठा, बांधकाम व इतर विभागामध्ये असे एकूण सुमारे सहाशे कर्मचारी कार्यरत आहेत. यातील बहुतांशी कर्मचारी हे भाडयाच्या खोलीत तर काही कर्मचारी पालिकेच्या चाळीत राहतात. सातारा पालिकेच्या मालिकेची लक्ष्मी टेकडी येथे चाळ असून त्या चाळीत पालिका कर्मचारी  पिढय़ान पिढय़ा राहतात. तर काही कुटुंबे ही पालिका कर्मचारी नसूनही राहतात असे सांगण्यात येते. या चाळीची दुरावस्था काही दिवसांपासून झालेली आहे. ही चाळ दुरुस्ती करण्यात यावी, नुतनीकरण करण्यात यावे अशी मागणी वारंवार पालिका कर्मचाऱयांच्याकडून होत होती. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी या चाळीकडे लक्ष घातले आहे. पालिकेच्या चाळीमध्ये गटर, पाणी, वीज, सार्वजनिक स्वच्छता असे अनेक प्रश्न भेडसावत होते. आता या चाळीमध्ये स्वच्छता, पाणी मिळणार आहे. तसेच ज्यांचा पालिकेशी संबंध नाही परंतु जे त्या चाळीत राहतात त्यांची माहिती घेवून त्यांची हकालपट्टी करुन पालिका कर्मचाऱयांना चाळीत निवारा देण्यात येणार आहे.

पालिका कर्मचाऱयांनी मानले मुख्याधिकाऱयांचे आभार

सातारा पालिकेचे कर्मचारी अभिजित बापट हे कर्मचाऱयांसाठी चांगले काम करत असून त्यांनी आताच घेतलेल्या या पालिका चाळीच्या नुतनीकरणाच्या कामामुळे त्यांचे आभार मानले जात आहे.

Related Stories

कोवाड पूरस्थिती जैसे थे, दिवसभर पाऊसाची उघड झाप सुरुच

Archana Banage

सुप्रीम कोर्टाचा निर्णय पवार साहेबांच्या हातात आहे का?

Patil_p

“जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंच्या अटकेची शक्यता”

Archana Banage

मंगलप्रभात लोढांनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

datta jadhav

कराडकरांनी सीसीटीव्हींसाठी एकजूट करावी

Patil_p

सांगली : मराठा आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्याचाच – दीपक शिंदे

Archana Banage