Tarun Bharat

पालिका कर्मचाऱ्यांच्या अभ्यास सहलीवर १२ लाख खर्च

Advertisements


सावंतवाडी / प्रतिनिधी:


सावंतवाडी पालिकेला स्वच्छता अभियानात केलेल्या कामामुळे अडीच कोटी रुपये शासनाकडुन प्रोत्साहनपर अनुदान मिळाले होते. या अनुदानातुन काही कामे करण्यात आली आहेत. तर काही प्रस्तावित आहेत. नगरपालिकेने ९ लाख रुपयांच्या बोटीही खरेदी केल्या. मात्र  नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांच्या स्वच्छताविषयक दौऱ्यावर १२ लाख रुपये खर्च केल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. इंदौर मध्यप्रदेशात हा दौरा जानेवारी २०२० मध्ये झाला. त्यात सत्ताधारी, विरोधी नगरसेवक आणि पालिका कर्मचारी मिळुन ४० जण सहभागी झाले होते. शहरात स्वच्छताविषयक उपक्रम राबविण्यासाठी हा दौरा होता, असे सांगण्यात आले.  स्वच्छता अभियानातून मिळालेला निधी कुठे खर्च केला, असा सवाल नगराध्यक्ष संजु परब यांना विचारला असता त्यांनी आरोग्य विभागाला खर्चाची आकडेवारी सादर करण्यास सांगितली. त्यात दौऱ्याच्या खर्चाची आकडेवारी स्पष्ट झाली. दौऱ्यावर ज्यादा खर्च झाला असे वाटत नाही काय, असे परब यांना विचारले असता या दौऱ्यात मी नव्हतो. मी आजारी होतो. याबाबत शिवसेना  गटनेत्या आनारोजिन लोबो यांना विचारा, असे सांगितले.

Related Stories

चिपळुणात सुवर्णकाराची आत्महत्या

Patil_p

टेस्टींग कीटचा गोंधळ कायम

Patil_p

जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश

Ganeshprasad Gogate

रघुवीर घाट तब्बल 36 तासांनी वाहतुकीसाठी मोकळा

Patil_p

ईशा प्रभू राज्यशास्त्र विषयात कोकण बोर्डात प्रथम

Ganeshprasad Gogate

खेडमध्ये आणखी आठ पॉझिटिव्ह

Patil_p
error: Content is protected !!