Tarun Bharat

पालिकेचे मुख्याधिकारी फिर से,अभिजित बापट…

Advertisements

प्रतिनिधी / सातारा :


सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांचे पुणे येथे बदली झाली होती. मात्र, ते तेथे हजरच झाले नव्हते. तर भोरचे मुख्याधिकारी डॉ. विजय थोरात यांची साताऱयात बदली झाली होती. मात्र, त्यांची पुणे येथे बदली झाल्याची ऑर्डर दि.14 रोजी आली होती. तर दि.15 रोजी सातारा पालिकेच्या रिक्त जागी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे कार्यभार सोपवल्याचा आदेश आला असून त्यांनी सकाळीच पुन्हा केबीनमध्ये जावून लोकांच्या समस्या सोडवत, नेहमीच्या कामांच्या फाइंलींचा निपटारा करण्यात दंग होते.


साताऱयाचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची पिंपरी चिंचवडला उपायुक्त म्हणून बदली झाली होती. ते साताऱयातच असावेत अशी मागणी जोर धरु लागली होती. विजय थोरात यांची साताऱयात बदली होवूनही त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. सातारा पालिकेत मुख्याधिकारी म्हणून बापट हेच पुन्हा येणार अशी चर्चा रंगत होती. बापट यांच्याबाबत सत्ताधारी विरोधक आणि सर्वसामान्य साताकर यांच्यामध्ये जिव्हाळयाचे नाते निर्माण झालेले आहे. दोन टर्म त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे. अचानक त्यांची बदली झाल्याने थोडासा नाराजीचा सुर होता. बुधवारी डॉ. विजय थोरात यांची पुणे येथे बदली झाल्याचा आदेश सगळीकडे व्हायरल झाला. तर गुरुवारी सकाळी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी पालिकेत जावून कार्यभार स्वीकारला. त्यांनी नागरिकांचे प्रश्न ऐकून घेवून त्याचे निराकारण करत होते. तोच दुपारी त्याच्याकडे सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार दिल्याचा आदेशच हाती मिळाला.


तरुण भारतचे वृत्त तंतोतंत खरे :


तरुण भारतने सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे पुन्हा कार्यभार आल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानुसार आज मंत्रालयातून सचिवांनी आदेशच दिल्याने त्यांच्याकडे कार्यभार सोपवल्याने तरुण भारतचे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.

Related Stories

चिंधवली शाळेत घुमतोय तंबाखूमुक्तीचा गजर

Abhijeet Shinde

महाबळेश्वर तालुक्यात वीज कोसळली, दोन गंभीर जखमी

Abhijeet Shinde

नागठाणेत शेतकऱयांचा आक्रोश मोर्चा

Patil_p

खरीप हंगाम बैठक संपन्न

Patil_p

टी अँड टी कंपनीकडून मुख्य जलवाहिनी फुटली

Patil_p

24 तासात 9 दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav
error: Content is protected !!