Tarun Bharat

पालिकेच्या तीन गाडय़ा भंगारात

केंद्र शासनाच्या धोरणाचा फटका – 15 वर्षाची कालमर्यादा पूर्ण

प्रतिनिधी/ सातारा

केंद्र शासनाने पंधरा वर्षांची मुदत संपलेली सरकारी वाहने भंगारात (स्क्रॅप) काढायचे धोरण जाहीर केले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. त्यानुसार सातारा पालिकेची तीन वाहने भंगारात निघणार आहेत. आठ वर्षापूर्वीच्या एका वाहनाला ग्रीन टॅक्स लागणार आहे.

       सातारा नगरपालिकेच्या आरोग्य, बांधकाम, अग्निशामन, पाणीपुरवठा या विभागांकडे मिळून 56 वाहने आहेत. त्यापैकी तीन वाहनांची 15 वर्षाची कालमर्यादा झाल्याने ही वाहने भंगारात निघणार आहेत. केंद्र शासनाने ही वाहने भंगारात काढण्याचे धोरण लागू केले आहे. यामध्ये अग्निशामन दलाची एक गाडी, एक ट्रक्टर व सक्शन गाडीचा समावेश आहे. उर्वरित वाहने काही वर्षापूर्वी खरेदी केली आहेत. दरम्यान, आठ वर्षे जुन्या सरकारी वाहनांना ग्रीन टॅक्स लावण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. पालिकेकडील एका वाहनाला ग्रीन टॅक्स लागणार आहे. यामुळे गाडय़ांसाठी वापरण्यात येणाऱया धातूंचा पुर्नवापर करता येईल. रस्ते अपघात कमी होतील.

Related Stories

महाराष्ट्रात 12,614 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

साताऱ्यात जुगार अड्डयावर छापासत्र

Patil_p

कस्तुरबा लसीकरण केंद्राला लावली शिस्त

Patil_p

विनयभंग प्रकरणी संजय धुमाळ यांना अटक

Patil_p

जिल्ह्यात २४ तासात सरासरी १३.७४ मि.मी. पावसाची नोंद

Archana Banage

उजनीचा उजवा कालवा फुटला; शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली, पिकांचं मोठं नुकसान

datta jadhav
error: Content is protected !!