Tarun Bharat

पालिकेच्या वसुली पथकाचे नियोजन कोलमडले

वसुलीचा रेट उतरला खाली, करमाफीच्या ठरावामुळे अनेकांनी कर भरण्याचे टाळले

प्रतिनिधी/ सातारा

सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील करदात्यांचा कर माफ करण्याचा विषय घेवून त्या विषयाला मंजूरी देण्यात आली. त्यामुळे अजून कर माफीला अनेक नियमाखालून जावे लागणार आहे. नगरविकास खाते त्याला मंजूरी देते की नाही हा पुढचा प्रश्न आहे. त्यामुळेच सातारा पालिकेच्या वसुली विभागाच्या वसुलीचे नियोजन पुरते कोलमडून गेले आहे. मार्च फेब्रुवारी महिना अर्धा झाला असून मार्च महिन्यात सगळय़ांची मार्च एण्डींग सुरु होते. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत खडखडात होण्याची भिती व्यक्त होत आहे. 

सातारा पालिकेने यावर्षी कर माफीचा विषय घेतला होता. त्यामुळे शहरातील सुमारे 38 हजार मिळकतधारकांबरोबरच नव्याने हद्दीत आलेल्या उपनगरावासियांना मात्र ही आनंदाची बातमी बरी वाटली. त्यामुळे अनेक करदात्यांनी आलेले बिल भरायचे थांबवले आहे. त्यातच पालिकेच्या वसुली पथकाला खमक्या अधिकारी नसल्याने वसुलीची मोहिम कशी करायची त्याला दिशा कशी द्याययची. प्रत्येक प्रभागात वसुली पथकाची गाडी फिरवण्यासाठी काय नियोजन करायला हवे, असे कोणतेही नियोजन अजून करण्यात आले नाही. जेव्हा पाठीमागे मुख्याधिकारी म्हणून अभिजीत बापट हेच होते तेव्हा त्यांनीच वसुली विभागाला मार्गदर्शन केले होते. आता मात्र वसुसी विभागाला खमक्या अधिकारी देण्याबरोबरच त्यांनी स्वतः लक्ष देवून वसुलीच्या कामासाठी लक्ष घालावे, अशी मागणी होवू लागली आहे.

Related Stories

जुलैची रेकॉर्ड ब्रेकच्या दिशेने वाटचाल

Patil_p

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना लढवणार ५० ते १०० जागा

Abhijeet Khandekar

प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्याकडे तक्रार दाखल मनसेचे राहूल पवार

Patil_p

कालेटेक येथे युवकावर चाकूहल्ला; कराड पोलिसात सातजणांवर गुन्हा

Archana Banage

पोलिसांनी पोलिसांसाठी सुरू केल ‘कोव्हिड सेंटर’

Archana Banage

कोयना परिसर भूकंपाने हादरला

Patil_p