Tarun Bharat

पालिकेत प्रशासक की मुदतवाढ

प्रतिनिधी/ सातारा

पाच वर्षापूर्वी सातारा पालिकेचे विद्यमान नगरसेवक व पदाधिकारी निवडून आले होते. त्यांचा कालावधी 22 डिसेंबरला संपत असून आपल्या वॉर्डात मंजूर कामे राहू नयेत यासाठी प्रत्येक वॉडातले नगरसेवक पालिकेत सकाळपासून असतात. दरम्यान, दि. 26 डिसेंबरला पालिकेवर प्रशासक येणार की विद्यमान नगरसेवक व पदाधिकाऱयांना मुदतवाढ देणार याकडेच लक्ष लागून राहिले आहे. बहुतांशी 26 डिसेंबरला प्रशासक येण्याचीच जास्त चर्चा सध्या सुरु आहे.

सातारा पालिकेच्या विद्यमान नगरसेवकांची मुदत दि. 22 डिसेंबरला संपते आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकाळात आपल्या वॉर्डात मंजूर कामे व्हावीत याकरता नगरसेवकांचा प्रयत्न सुरु आहे. मग कोणाच्या वॉर्डात रस्ते करण्याचे काम सुरु आहे कोणाच्या वॉर्डात शौचालयाचे तर कोणाच्या वॉर्डात गटरचे काम वेगात सुरु आहे. काहींनी केलेल्या कामांची उद्घाटने ठेवली आहेत. आपल्याच नावाची पाटी कशी लागेल यासाठी सगळय़ा खटपटी सुरु आहेत. पालिकेमध्ये बहुतांशी नगरसेवकांची गर्दी दिसत असून बांधकाम विभागात मुख्य अभियंता दिलीप चिद्रे यांच्याभोवती नगरसेवकांचे कोंढाळे असते. आमच्या वॉर्डात रस्ता करण्याच्या अगोदर नळ कनेक्शनचे काम करुन घ्या अन् मगच रस्ता करा, अशा सूचना दिल्या जात आहेत. तर काही नगरसेवक आपल्या वॉर्डात केलेल्या कामांची बिले ठेकेदाराला मिळाली नाहीत ती काढण्यासाठी प्रत्यक्ष पालिकेत येत आहेत. 22 तारखेच्या आत बिल निघाले म्हणजे आपण सुटलो. अगदी ठेकेदारालाच सोबत घेऊन पालिकेत फिरत असतात. त्यामुळे 22 तारखेचीच सगळय़ांना आशा लागली असून त्यानंतर दि. 26 रोजी पालिकेवर प्रशासक येणार की आहे यांना मुदतवाढ मिळणार याकडे सगळयांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. तरीही प्रशासक लागण्याची जास्त शक्यता व्यक्त होत आहे. प्रशासक लागल्यास नगरसेवकांना कामकाज करता येणार नाही. त्यामुळे नगरसेवकांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.

Related Stories

साताऱयावरचा हॉटस्पॉट शिक्का कायम

Amit Kulkarni

गडहिंग्लजला मास्क न लावणा-या तिघांवर कारवाई

Archana Banage

मुक्ताई भवानी वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा

datta jadhav

नूतन आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी स्विकारला पदभार

Patil_p

कराडमध्ये शाळांचे निर्जंतुकीकरण

Patil_p

गांधींना मारण्यासाठी सावरकरांनी गोडसेला बंदुक पुरवली

datta jadhav