Tarun Bharat

पालिकेत महिलाराज; राजेंचा नवा फॉर्म्युला

सर्व सभापतीपदी होणार महिलांची निवड

विशाल कदम/ सातारा

पालिकेच्या निवडणुकीला एक वर्ष उरललेले असताना विषय समितीच्या सभापती निवडीमध्ये आघाडीचे नेते खासदार उदयनराजेंनी नवा फॉर्म्युला जलमंदिर पॅलेस येथे रात्रीच्या बैठकीत पुढे आणल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. सर्वच सभापतीपदांवर महिलांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे साविआमध्ये नाराजीनाटय़ाला सुरुवात होण्याची शक्यता वाढली आहे. तर दुसऱया बाजूला नाराज झालेले काहीजण नविआचे नेते आमदार शिवेंद्रराजेंच्याकडे तर काहीजण हे राष्ट्रवादीकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सोमवारी विशेष सभेत होणाऱया निवडीनंतर अनेक घडामोडी सुरु होणार आहेत. 

सातारा पालिकेत सध्या असलेल्या काही सभापतींचे काम अतिशय दर्जाहिन असे सुरु आहे. नागरिकांची कामे होत नाही. आरोप होत होतात. नागरिकांची कामे करण्याऐवजी आपल्याच नातेवाईकांचे भले पाहिले जाते. हे सारे बदलेल असे सातारकरांना वाटले होते. विषय समितीच्या सभापती निवडीत येत्या साविआला जनमाणसात घेवून जाणारे चेहरे दिले जातील, अशी शक्यता सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात होती. परंतु जलमंदिर पॅलेस येथे रात्रीच्या झालेल्या सातारा विकास आघाडीच्या बैठकीत सर्वच ठिकाणी महिलांना संधी देण्याचे ठरले. साविआच्या एकदा ठरले की ठरले आहे. यानुसार सर्वच ठिकाणी महिलांना संधी देण्याचे ठरलेले आहे.

बांधकाम सभापतीपदी भाजपच्या सिद्धी पवार, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, महिला बालकल्याण सभापती रजनी जेधे अशी नावे अंतिम झाली आहेत. त्यामुळे सातारा विकास आघाडीमध्ये ही नावे अंतिम झाल्यानंतर यातील काही नावांना सातारा विकास आघाडीच्या अनेक नगरसेवकांनी खासगीत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे येत्या काही दिवसात सातारा विकास आघाडीमध्ये नाराजीनाटय़ दिसून येणार आहे. खासदार उदयनराजे यांचा नवा फॉर्म्युला महिला राजचा कितपत यशस्वी होणार आहे?, कितपत येवू घातलेल्या निवडणुकीमध्ये पॉझिटीव्ह ठरतो आहे हेच पहायला मिळणार आहे.

नावे अंतिम झाली असून सोमवारी निवडीवेळी नेमकी हिच नावे समोर येणार असून नाराज झालेले काही नगरसेवक व त्यांचे कार्यकर्ते हे सुरुची किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

एकटय़ा मनोज शेंडेच्यावर धुरा उपनगराध्यक्ष असलेले मनोज शेंडे हे ऍक्टीव्ह असले तरीही शेवटच्या वर्षात संपूर्ण सातारा शहराची जबाबदारी सांभाळण्याची धुरा उपाध्यक्ष म्हणून शेंडे यांच्यावर रहाणार आहे. सर्वच सभापती व नगराध्यक्ष या महिला असल्याने होणाऱया तक्रारी, विरोधकांचे आरोप हे आता एकटय़ा मनोज शेंडे यांना ढालीप्रमाणे झेलावे लागणार आहेत. सातारा विकास आघाडीमध्ये जान आणण्यासाठी शेंडेना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Related Stories

आमदारांचं निलंबन एकतर्फी, विरोधी पक्षाचा नंबर कमी करण्याचा हा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस

Archana Banage

महाराष्ट्रात कोरोनाचा टक्का वाढला; सक्रीय रुग्णसंख्या 3 लाख 36 हजारांवर

Archana Banage

मंडलाधिकारी निकम लाचलुचपतच्या जाळ्यात

datta jadhav

दान मिळालेल्या जागेवर पालिकेची नवी इमारत कधी ?

Amit Kulkarni

राज्यात रुग्णालयांच्या ठिकाणीच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांच्या उभारणीवर भर

Archana Banage

डॉक्टरांच्या संपामुळे 36 हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात

datta jadhav