Tarun Bharat

पाली वळके सीमेनजीक बिबट्याचा वावर

वार्ताहर / पाली

पाली देवतळे वळके सीमेनजीक गुरुवारी सकाळच्यादरम्यान फीरण्यासाठी व व्यायामासाठी या परीसरात गेलेल्या नागरीकांसमोर बिबट्याने पाली वळके हा रस्ता अचानक झेप घेत ओलांडला व तो पलीकडील जंगलमय भागात गेला. काही दिवसात त्याच परिसरातील चार ते पाच कुत्रे बिबट्याने मारल्याने आता बिबट्या सवयीने नागरीवस्तीत सातत्याने वावरत असल्याने सर्वत्र घबराट पसरलेली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि पाली देवतळे वळके सीमेनजीक गुरुवारी सकाळच्या दरम्यान व्यायामासाठी या परीसरात गेलेल्या नागरीकांसमोर बिबट्याने पाली वळके हा रस्ता अचानक झेप घेत ओलांडला व तो पलीकडील जंगलमय भागात गेला. तसेच मागील आठवड्यात याच परिसरातील चार ते पाच कुत्रे त्याने मारलेली आहेत. हा बिबट्याचा वावर होत असलेला परिसर मुख्य नागरीवस्तीचा भाग असल्याने या परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

येथून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर वळके बांबर या गावांचा जंगलमय परिसर असून येथे मागील काही वर्षामध्ये मोठी जंगलतोड झाल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीकडे सहजरीत्या येत आहेत. तसेच सध्या भातकापणीचा हंगाम असल्याने शेतकरी शेतामध्ये कापणीस जाण्यास बिबट्याच्या भीतीमुळे घाबरत आहेत. त्यामुळे पाली बाजारपेठ सुतारवाडी या परिसरात फिरणाया बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.

Related Stories

आजपासून आठवडाभर ‘कडक’ लॉकडाऊन

Patil_p

पावस येथे एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Archana Banage

कशेडी घाटात बसवर आदळून दुचाकीस्वार जागीच ठार

Patil_p

…तर पैशासाठी आम्ही झोळी घेऊन फिरू

tarunbharat

माडय़ाचीवाडीत ‘नवदुर्गां’च्या कर्तृत्वाचा सन्मान

NIKHIL_N

सीएसआर निधीतून सायकलींचे वाटप

Anuja Kudatarkar