Tarun Bharat

पाळीव प्राण्यांचा क्लोन तयार करतेय कंपनी

‘हमशक्ल’ निर्माण करण्यासाठी मोठा खर्च

विज्ञानाच्या मदतीने माणसांचे क्लोन तयार केले जात असल्याचे दृश्य चित्रपटांमधून पाहिले असेल. माणसांचा क्लोन तयार करणे सध्या तरी शक्य नाही, परंतु जगात प्राण्यांचा क्लोन तयार करण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील एक कंपनी मोठय़ा प्रमाणावर ऍनिमल क्लोनिंग करत असून याकरता मोठी रक्कम आकारत आहे.

कोरोना महामारीनंतर वायाजेन नावाच्या कंपनीकडे प्राण्यांचे क्लोनिंग करण्यासाठी मोठी प्रतीक्षायादी निर्माण झाली आहे. लोक स्वतःच्या पाळीव प्राण्यांचा क्लोन तयार करवून घेऊ इच्छित आहेत. वायाजेन कंपनीच्या पदाधिकारी लॉरेन एस्टन यांनी 2015 पासून मांजर आणि श्वानांचा क्लोन तयार करण्याचे काम कंपनी करत असल्याचे म्हटले आहे.

लाखोंमध्ये खर्च

सध्या मांजराचा क्लोन तयार करण्यासाठी 26 लाख रुपयांचा खर्च करावा लागतो आणि तर श्वानासाठी हाच खर्च 38 लाख रुपयांपर्यंत पोहोचत आहे. प्राण्यांचे डॉक्टर प्राण्यांची स्कीन बायोप्सी करतात आणि मग सॅम्पल टेक्सास येथील प्रयोगशाळेत पाठविले जातात. जेथे पेशी निर्माण केल्या जातात आणि मग त्यांना फ्रीज केले जाते. प्राण्यांचे डेंटल क्लीनिंग किंवा न्यूटर करविण्यासाठी नेण्यात आल्यावर डीएनए सॅम्पल घेणे योग्य ठरते. प्राणी मृत्युमुखी पडल्यावर 5 दिवसांपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते असे एस्टन यांनी सांगितले आहे.

कसे तयार होतात क्लोन? फ्रोजेन डीएनएला वायाजेन पेट्स क्रायोस्टोरेज फॅसिलिटीमध्ये ठेवण्यात येते आणि प्रक्रिया केली जाते. वायाजेनचे वेज्ञानिक डोनर एगच्या न्युक्लियसला फ्रोजन सेलद्वारे रिप्लेस करतात. त्यानंतर स्वतःच्या प्रक्रियेयच गुप्त पद्धतीद्वारे एम्ब्रयो तयार केले जातात. मग हे एम्ब्रयो सरोगेटमध्ये टाकले जातात आणि त्यानंतर सर्वसामान्य श्वान किंवा मांजर जन्म देते. हे क्लोन 100 टक्क्यांपर्यंत जेनेटिक ट्विन्स असतात. परंतु त्यांचे स्वभाव अत्यंत वेगळे असतात.

Related Stories

115 वर्षे जुन्या बाइकची 7 कोटीमध्ये विक्री

Patil_p

कधीच पाऊस न पडणारे गाव

Amit Kulkarni

नवी संसद

Patil_p

केवळ मुलींचा जन्म होणारे गाव

Amit Kulkarni

आव्हान बालमजुरीचे!

Patil_p

भावासाठी बहिण घेऊन जाते वरात

Amit Kulkarni