Tarun Bharat

पाळीव श्वानासाठी 5 कोटीची चेन

Advertisements

मालकीणीसारखा सुंदर दिसण्यासाठी मोठा खर्च , चेन अन् श्वानाच्या सुरक्षेसाठी रक्षक तैनात

एका महिलेने स्वतःच्या पाळीव श्वानासाठी असे काम केले, जे जाणून घेतल्यावर लोक दंग झाले आहेत. या महिलेने श्वानासाठी कोटय़वधी रुपयांचा हिऱयाचा कॉलर तयार करवून घेतला, एवढेच नाही तर आता श्वान आणि कॉलरच्या सुरक्षेसाठी महिलेने बॉडीगार्डच नेमला आहे.

ब्रिटनच्या लंडनमध्ये राहणाऱया 37 वर्षीय ज्वेलर नॅथली नॉफ यांनी स्वतःच्या श्वानासाठी 5 कोटी रुपयांचा एक डायमंड चेनवजा कॉलर तयार करवून घ्sतला. एका डॉग शोमध्ये श्वानाच्या गळय़ात महागडी चेन पाहिल्यावर लोक दंग झाले. ही चेन 15 कॅरेट हिऱयांद्वारे तयार करण्यात आली होती.

शन आणि त्याच्या गळय़ातील हिऱयाची चेन सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही एक बॉडीगार्ड नियुक्त केला आहे. बॉडीगार्ड सदैव श्वानाची काळजी घेतो असे नॅथली यांनी सांगितले आहे. प्रत्येक जण पाहत राहिल असे काही तरी स्वतःच्या श्वानाला देण्याचा विचार नॅथली यांनी यामागे केला होता. याचमुळे त्यांनी हिऱयाची चेन तयार करवून घेतली होती. त्यांचा श्वान पोमेरियन ब्रीडचा असून सध्या तो 4 वर्षांचा आहे.

स्वतःच्या मालकाप्रमाणे सुंदर दिसण्याचा श्वानांनाही हक्क आहे. मी हिऱयाची चेन चोरी होण्याची चिंता करत नाही, कारण श्वानाजवळ चोवीस तास सुरक्षा आहे. बॉडीगार्ड्सची एक टीम सदैव आमच्यासोबत असते. श्वानावर मी प्रचंड प्रेम करत असल्याने त्याच्यासमोर चेनचे काहीच मूल्य नसल्याचे नॅथली यांनी म्हटले आहे.

Related Stories

‘नीरव’ कारनामे !

Amit Kulkarni

जुळय़ा भावांचा जुळय़ा बहिणींशी विवाह

Patil_p

सुधीर गाडगीळ यांना अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा पुरस्कार जाहीर

prashant_c

5G सुपरफास्ट…लवकरच…!

Abhijeet Khandekar

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर : यंदा केवळ विश्वस्तांच्या उपस्थितीत दत्तजन्म सोहळा

Tousif Mujawar

कधीच पाणी न पिणारा उंदीर

Amit Kulkarni
error: Content is protected !!