Tarun Bharat

पाळोळे किनाऱयावर पर्यटकांची गर्दी

प्रतिनिधी/ काणकोण

कोरोना महामारीमुळे मागच्या दोन वर्षांत ठप्प झालेल्या काणकोणच्या पर्यटन व्यवसायाला सध्या नेटाने सुरुवात झाली असून शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवसांत या तालुक्यातील पाळोळे, होवरे, आगोंद हे किनारे पर्यटकांनी फुलून जात आहेत. पाळोळे किनाऱयावर नेहमीचीच गर्दी असून या भागातील हंगामी तंबू तसेच शॅक्समध्ये पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मात्र अरूंद रस्त्यामुळे आणि रस्त्याजवळच्या पदपथाला भिडून काही दुकानदारांनी दुकाने लावल्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम जाणवत असल्याच्या तक्रारी वाढायला लागल्या आहेत.

बहुतेक देशी पर्यटक स्वतःच्या वाहनांनी येत असल्यामुळे आणि पाळोळे, होवरे येथील वाहनतळ अपुरा पडत असल्यामुळे वाहनांच्या या ठिकाणी रांगा लागल्याचे चित्र शनिवारी संध्याकाळी पाहायला मिळाले. या ठिकाणी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात केलेले पोलीस कर्मचारी देखील हतबल झाले होते. काणकोण पालिकेने वाहनतळासाठी वेगळी जागा निश्चित करण्याच्या दृष्टीने लक्ष द्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

ओकांब धारबांदोडा येथे बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

Patil_p

‘त्या’ मातेवर लैंगिक अत्याचार, गुन्हा नोंद

Patil_p

मास्क, सॅनिटायझर, डेटॉलवर कोटय़वधींची उलाढाल

Patil_p

विद्याधीशतीर्थ स्वामींच्या कुमठा येथील चतुर्मास व्रताची सांगता

Amit Kulkarni

मिशन मोदी अगेन पीएम मोहिमेचा राज्यात विस्तार करणार

Patil_p

आपच्या उर्जामंत्र्यांनी कुडतरीतील महिला गट, शेतकऱयांची घेतली भेट

Amit Kulkarni