Tarun Bharat

पाळोळे भागात गढूळ पाण्याचा पुरवठा

स्थानिकांनी साहा. अभियंत्यांसमोर मांडली समस्या

प्रतिनिधी /काणकोण

काणकोण नगरपालिका क्षेत्रातील पाळोळे परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा चालू असून या भागातील नागरिकांनी नळाद्वारे येत असलेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन काणकोणच्या पाणीपुरवठा खात्याचे साहाय्यक अभियंता लेस्टर डिसोझा यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर समस्या मांडली.

यावेळी स्थानिकांच्या समवेत प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस जनार्दन भंडारी, पाळोळे येथील सामाजिक कार्यकर्ते गास्पार कुतिन्हो उपस्थित होते. समस्या मांडणाऱयांमध्ये महिलांचाही समावेश होता. ज्या भागातून पाळोळे येथे पाणीपुरवठा केला जातो तेथे देखरेख ठेवण्याचे काम जी व्यक्ती करते त्याच्या दुर्लक्षामुळे असे प्रकार घडत असतात. बऱयाच वेळा जलवाहिनी फुटते, पण त्याची माहिती संबंधित व्यक्तींना नसते आणि पाण्याचा पुरवठा करताना गढूळ पाणी सोडले जाते, अशी कैफियत स्थानिक ग्रामस्थांनी मांडली. यात सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली.

Related Stories

अपघात टाळण्यासाठी चक्क दिशादर्शकाचा वापर

Amit Kulkarni

गोव्यात अवेळी पावसाच्या सरी

Amit Kulkarni

इफ्फीतील फिचर, नॉन फिचर चित्रपटांची घोषणा

Patil_p

पावसाळा सुरू झाला, तरी कुडचडेत तयारी अर्धीच

Amit Kulkarni

लागली चतुर्थीची ओढ…

Omkar B

माडेल येथील घाऊक मासळी बाजार तात्पुरता हलविणार

Amit Kulkarni