Tarun Bharat

पावल्युचेंकोव्हाला सिनसिनॅटी स्पर्धा हुकली

सिनसिनॅटी  : रशियाची महिला टेनिसपटू ऍनास्तेशिया पावल्युचेंकोव्हाला व्हिसाच्या समस्येमुळे डब्ल्यूटीए टूरवरील सिनसिनॅटी मास्टर्स टेनिस स्पर्धेला मुकावे लागत आहे. पावल्युचेंकोव्हाने प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती.

गेल्या आठवडय़ात माँट्रियल येथे झालेल्या टेनिस स्पर्धेत पावल्युचेंकोव्हाचे आव्हान दुसऱया फेरीतच समाप्त झाले होते. सिनसिनॅटी टेनिस स्पर्धेत पावल्युचेंकोव्हाचा सलामीचा सामना अमेरिकेच्या पेरा बरोबर मंगळवारी खेळविला जाणार होता. पण व्हिसा समस्येमुळे ती या स्पर्धेसाठी वेळेवर उपस्थित राहू शकली नाही. अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पावल्युचेंकोव्हाला उपांत्यपूर्व फेरीत बेन्सिककडून पराभव पत्करावा लागला होता.

Related Stories

आशियाई पॅरा स्पर्धेत भारताला 41 पदके

Amit Kulkarni

श्रीजा अकुला, शरथ कमल, मनिका बात्रा जागतिक टेटे स्पर्धेसाठी पात्र

Patil_p

दुती चंद उत्तेजक चाचणीत दोषी तात्पुरत्या निलंबनाची कारवाई

Patil_p

एमपीएल स्पोर्टस् भारतीय संघाचे नवे किट प्रायोजक

Patil_p

नेदरलँडस्ची एकतर्फी बाजी

Patil_p

मल्ल सुमित मलिक दुसऱया चाचणीसाठी राजी

Patil_p