Tarun Bharat

पावसच्या अपूर्व सामंतचा दिल्लीत झेंडा

प्रतिनिधी/ रत्नागिरी

महाभारतातील द्यूत खेळाच्या संकल्पनेचा अभिनव पद्धतीने वापर करून रत्नागिरी तालुक्यातील पावस येथे नववीत शिकणाऱया अपूर्व हरिश सामंत या विद्यार्थ्याने चक्क कोरोना द्यूत या शैक्षणिक खेळण्याची निर्मिती केली. राष्ट्रीय खेळणी स्पर्धेत अपूर्वच्या या खेळण्याने देशात तिसरा क्रमांक पटकावून 5000 रुपयांचे पारितोषिक आपल्या नावावर केले आहे.

 या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा हा आभासी पद्धतीने पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर व पद्मभूषण डॉ. जे. बी. जोशी उपस्थितीत होते. विज्ञान दिनानिमित्त राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली व मुक्तांगण एक्सप्लोरेटरी, पुणे यांनी ‘खेल खेल में 2021’ ही खेळणी जत्रा आयोजित केली होती.

 चार निकषांवर झाले गुणदान

या जत्रेअंतर्गत भारतीय खेळणी किंवा खेळ, ऑनलाईन डिजिटल खेळणी, प्रत्यक्ष खेळणी (physical  toys) शैक्षणिक खेळणी या प्रकारांमध्ये खेळणी बनवण्याचे आव्हान मुलांसमोर ठेवले होते. या मुलांनी बनवलेल्या खेळाचे 4 निकषांवर आधारित गुणदान केले गेले. त्यामध्ये भारतीय संस्कृती व इतिहास मूल्य, सामाजिक व मानव मानवी मूल्य, पर्यावरण व दिव्यांग मुलांसाठी उपयुक्तता, out of the  box -creative and fun आणि भारतीय पारंपरिक खेळाचे नवे रूप या निकषांचा विचार केला गेला.

2 लाख 50 हजार विद्यार्थी सहभागी

या निकषांना पूर्ण करत स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर प्रशालेत नववी इयत्तेत शिकणाऱया अपूर्व हरीश सामंत याच्या कोरोना द्यूत या खेळाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. या स्पर्धेत विविध स्तरावर 2 लाख 50 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. याचे परीक्षण रजत अग्रवाल, अतुल यादव (इन्फोसिस), अशोक पानवलकर (संचालक, 3 एफ डिझाईन कंपनी), डॉ. अरविंद शाळीग्राम, (पुणे विद्यापीठ), हेमंत लागवणकर (science communicator) रवींद्र गोडबोले (आयआयएससी, बंगळुरू) यांनी केले.

लॉकडाउढन काळाचा सदुपयोग

लॉकडाउढन काळात घरातून बाहेर न पडता घरातले साहित्य वापरून लहान मुलांना कोरोनाची असणारी भीती कशी दूर करता येईल या विचाराने खेळ तयार करण्यात आला. अपूर्वने ही संकल्पना त्यावेळी सुरू असलेल्या महाभारताच्या मालिकेतून घेतली होती. त्याने कल्पकतेने कोरोना द्यूत या खेळातून कोरोनापासून सावधान राहण्याचे नियम लहान मुलांना समजतील अशी या खेळाची रचना केली आहे. यापूर्वी उज्जैन एफ एम मंचातर्फे घेतलेल्या आंतरराष्ट्रीय खेळणी स्पर्धेत या खेळाची निवड जागतिक पातळीवर पहिल्या 30 खेळांमध्ये करण्यात आली होती.

——–

Related Stories

गोवा सीमेवर आजपासून थर्मल स्क्रीनिंग

NIKHIL_N

ओबीसींना 27 टक्के राजकारणात आरक्षण शिंदे -फडणवीस सरकार मुळेच

Anuja Kudatarkar

‘प्रधानमंत्री आवास’च्या रकमेवर ग्रामसेवकाचाच डल्ला

Patil_p

चिपळुणात मारहाण प्रकरणी 21जणांवर गुन्हे

Patil_p

15 वर्षानंतर पुन्हा भारत – पाकिस्तान फायनल होणार?

Anuja Kudatarkar

वणव्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Patil_p