Tarun Bharat

पावसाची विक्रमी नोंद, 25 इंच जादा पाऊस

पेडणेत शतकाच्या उंबरठय़ावर, पणजीत दिवसभरात 4 इंच पाऊस

प्रतिनिधी/ पणजी

पेडणे शतकाच्या उंबरठय़ावर असून आज शतक पार करण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सून सक्रीय झालेला आहे. शनिवारी संपूर्ण गोव्याला पावसाने झोडपून काढले. गेल्या 24 तासात पणजीत 4 इंच, काणकोणमध्ये साडेचार इंच पाऊस झाला. राज्यात आगामी 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरल्यास गोव्याची वाटचाल ओल्या दुष्काळाच्या दिशेने चालेले. यावर्षी सरासरीच्या तुलनेत 25 इंच जादा पाऊस झाला आहे.

गेल्या 24 तासात मुसळधार पावसाने राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या कित्येक वर्षातील रेकॉर्ड यावर्षी पावसाने मोडला आहे व आतापर्यंत 25 इंच जादा पाऊस झालेला आहे. यंदाच्या मोसमात आतापर्यंत पडलेला पाऊस हा 82 इंच झाला आहे. आजही गोव्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज पणजी वेधशाळेने व्यक्त केला आहे. गेल्या 24 तासात सर्वांधिक 4.5 इंच पावसाची नोंद काणकोणमध्ये झाली. पणजी, जुने गोवे येथे प्रत्येकी 4.40 इंचाची नोंद झाली. केपेमध्ये 4 इंच, पेडणे, सांखळी, वाळपई, मडगाव येथे प्रत्येकी 3.50 इंच, म्हापसा, दाबोळी, सांगे येथे 3.25 इंच, मुरगाव येथे 3 इंच पावसाची नोंद झाली.

राज्यात 3 इंचापेक्षा कमी कोठेही पाऊस झालेला नाही. 21 जुलैपर्यंत राज्यात जोरदार वारे वाहतील. समुद्रातून लाटांची उंची 4 मीटरपर्यंत जाईल, पणजीत दिवसभरात पावसाचा वेग थोडा मंदावला व केवळ 21 मि. मी. एवढा पूस भरदिवसा झाला. दरम्यान, यंदाच्या मौसमात पडलेला पाऊस 82 इंच झालेला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत 25 इंच जादा व विक्रमी पाऊस झाला. पेडणेमध्ये 96 इंच पाऊस आतापर्यंत नोंदविला असून आज तो शतक पार करण्याची शक्यता आहे.

Related Stories

चक्रीवादळामुळे सत्तरीत 25 लाखांच्या नुकसानीचा अंदाज

Patil_p

शिक्षक हा देशप्रेमी घडविणारी शक्ती

Amit Kulkarni

हंगामातील पहिले आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाज दाखल

Omkar B

म्हापसा येथे सहा लाखाचा ड्रग्ज जप्त

Amit Kulkarni

मडगाव स्कूल कॉम्प्लॅक्स पतसंस्थेला 50 लाखाहून अधिक नफा; सभासदांना 15 टक्के केला परतावा

Amit Kulkarni

विधानसभेतही भाजपलाच बहुमत

Amit Kulkarni