Tarun Bharat

पावसाच्या दडीने शेतकरी चिंतेत

चार दिवसांत पाऊस न पडल्यास भातपिकाला फटका बसण्याची शक्यता

बेळगाव

गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. केवळ ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होत आहे. उगवण झालेल्या भातपिकाला तसेच दुबार पेरणी केलेल्या पिकालाही पावसाची गरज आहे.

यावषी मान्सूनची सुरुवातच जोरदार झाली. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. काही ठिकाणी पूर आल्यामुळे भातपिकाचे नुकसान झाले. पाऊस कधी जातो याची वाट पाहावी लागली होती. मात्र आता पाऊस जाऊन वातावरण कोरडे झाले आहे. भातपीक वाळून जात आहे. पेरणी केलेल्या भातपिकालाही पावसाच्या शिडकाव्याची गरज आहे.

आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली असून त्याचे वाहन कोल्हा आहे. त्यामुळे हा पाऊस कमी असतो, असे जाणकारांचे मत आहे. सध्या ढगाळ वातावरण तसेच अधूनमधून ऊन पडत आहे. त्यामुळे समस्या निर्माण होण्याची शक्मयता आहे.

भात लावणीला पावसाची नितांत गरज

तालुक्मयातील काही गावच्या शिवारांमध्ये भात लावणी (रोप) केली जाते. त्यापूर्वी चिखल करावा लागतो. त्यामुळे मोठय़ा पावसाची गरज असते. आता पावसाअभावी जमिनीत साचलेले पाणी पूर्ण सुकून गेले आहे. त्यामुळे चिखल करणे अवघड असून भात लावणीसाठी जोरदार पावसाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱयांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

Related Stories

साहित्यामधून अनंत मनोहर नेहमीच स्मरणात राहतील

Amit Kulkarni

बसस्थानकात आसनांअभावी प्रवाशांची गैरसोय

Amit Kulkarni

कर्नाटक : धावत्या बसला आग, ५ जणांचा होरपळून मृत्यू ; २७ जखमी

Archana Banage

कंझ्युमर आयुक्त फोरमसाठी आंदोलन

Amit Kulkarni

मलप्रभा ब्रिजवर दोन अवजड वाहनांची धडक, जिवीतहानी टळली

Archana Banage

निवृत्त कर्मचाऱयांची मनपा नोकर संघटनेकडे धाव

Amit Kulkarni