Tarun Bharat

पावसाने झोडपले, दिवसभरात 4.5 इंचांची नोंद

प्रतिनिधी / पणजी

गेल्या 24 तासात राज्याला पावसाने झोडपून काढले. सर्वाधिक 4.5 इंच पाऊस हा मुरगाव तालुक्यात झाला. आगामी 4 दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस पडणार, असा अंदाज पणजी वेधशाळेने दिला आहे.

राज्यात पावसाचा जोर कायम असून शुक्रवारी अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. तर गुरूवारी रात्री सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत चालूच होता. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज 13 जून ते 16 जून या कालावधीत गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस वीजांचा गडगडाट तसेच 40 ते 50 कि. मी. या वेगाने वादळी वारे वाहतील. 15 व 16 जून रोजी जोरदार पाऊस पडेल असेही म्हटले आहे.

गेल्या 24 तासात पणजीसह वास्को शहराला अक्षरशः झोडपून काढले. दाबोळीमध्ये 4.5 इंच पावसाची नोंद झाली. मुगावात देखील जवळपास तेवढाच पाऊस झाला. केपे व पणजीत प्रत्येकी 3.5 इंच. जुने गोवे व मडगावात प्रत्येकी 2.5 इंच पाऊस झाला.

पुढील 4 दिवसा पावसाचे आहेत. पावसाबरोबर वादळी वारेही वाहतील. शुक्रवारी स. 8.30 ते सायं. 5.30 या दरम्यान अर्धाइंच पावसाची नोंद पणजीत झाली. गेल्या 24 तासात राज्यात 3.50 इंच एवढी पावसाची नोंद झाली आणि यंदाच्या मौसमात आतापर्यंत सरांसरी पेक्षा 5 इंच जादा पाऊस झालेला आहे. यंदाच्या मौसमात आतापर्यंत एकूण 16 इंच पावसाची नोंद झालेली आहे.

Related Stories

नेत्रावळी अभयारण्यातही आग

Amit Kulkarni

जीपीएससीकडून पात्र उमेदवारावर अन्याय

Amit Kulkarni

डिचोली तालुक्मयाला पावसाने झोडपले

Omkar B

कोरोना रुग्णांना सर्वोत्कृष्ट आरोग्य सुविधा

Patil_p

कोलवाळ येथे कॉल सेंटरचा पर्दाफाश

Amit Kulkarni

सत्तरी तालुक्मयातील वादळी वाऱयाचा फटका. नैसर्गिक पडझड, वाहंनाची नुकसानी,वीजयंत्रणेचे नुकसान

Omkar B
error: Content is protected !!