Tarun Bharat

पावसामुळे वीजपुरवठा विस्कळीत

शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी अंधार

प्रतिनिधी /बेळगाव

विजांच्या कडकडाटासह मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. झाडांच्या फांद्या पडल्यामुळे रात्रीपासून बुधवारी दिवसभर शहरासह तालुक्मयातील अनेक भागात वीजपुरवठा ठप्प होता. यामुळे अनेकांना मंगळवारची रात्र अंधारातच काढावी लागली.

संभाजी गल्ली, महाद्वार रोड येथे मंगळवारी रात्रीपासून वीजपुरवठा ठप्प झाला. वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे संपूर्ण गल्ली अंधारात होती. वीज नसल्यामुळे अनेकांचे मोबाईलही बंद पडले. पाऊस जोरदार असल्यामुळे दुरुस्तीचे कामही करता येत नव्हते. बुधवारी सकाळपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. ज्या ज्या भागात वीजपुरवठा ठप्प होता त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात येत होती. चन्नम्मानगर येथेही बुधवारी सकाळपासून दुरुस्तीचे काम करण्यात येत होते.

बेळगाव शहरासह तालुक्मयाला या जोरदार पावसाचा फटका बसला. मंगळवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून वीज नसल्यामुळे रात्र अंधारात काढावी लागली. बुधवारीही दुरुस्ती होईपर्यंत नागरिकांना वाट पहावी लागली. पावसाने उसंत घेतल्यामुळे काही प्रमाणात दुरुस्तीचे काम करण्यात आले.

Related Stories

ढगांच्या गडगडाटासह पावसाने झोडपले

Amit Kulkarni

धामणेत 16 पासून सामुदायिक पारायण सोहळा

Amit Kulkarni

कणबर्गी योजनेतील अनधिकृत बांधकाम रोखले

Amit Kulkarni

बन्नंजे राजासह आठजणांना जन्मठेप

Tousif Mujawar

रेल्वे बसस्थानकाजवळ अनोळखी वृद्धाचा मृतदेह

Amit Kulkarni

खानापूर तालुका म. ए. समितीच्या रास्तारोकोला यश

Tousif Mujawar