Tarun Bharat

पावसाळय़ात होणाऱया आजारांपासून सतर्क रहा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाळय़ात पसरणाऱया आजारांबद्दल सतर्कता बाळगण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. मोदींनी डीडी न्यूजच्या एका वृत्ताला ट्विट करत हा आजारांचा काळ असून सर्वांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन करत असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधानांनी मान्सूनच्या काळात डासांपासून उद्भवणाऱया आजारांपासून कशाप्रकारे वाचता येते यासंबंधीचे डीडी न्यूजचे वृत्त रीट्विट केले आहे. तसेच सरकारकडून उचलण्यात आलेल्या पावलांची माहितीही त्यांनी दिली आहे.

फैलावणाऱया साथी म्हणजेच डेंग्यू, मलेशिया आणि चिकनगुनियाचेही रुग्ण वाढू लागले आहेत. राजधानी दिल्लीत स्वाइन फ्ल्यूचे 400 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णास वेळीच उपचार न मिळाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

Related Stories

वाहतूक नियंत्रणासाठी तामिळनाडू-आंध्रप्रदेशच्या सीमेवर भिंत

prashant_c

”…तर रशिया अण्वस्त्राचा वापर करणार”

Abhijeet Khandekar

संजद प्रदेशाध्यक्षपदी उमेश कुशवाह

Patil_p

देशात 54,366 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

भूज येथे स्मृतिवन स्मारकाचे उद्घाटन

Patil_p

हा हिंदूंचा देश, हिंदुत्त्ववाद्यांचा नाही…

datta jadhav