Tarun Bharat

पावस पंचक्रोशीत पिसाळलेल्या बिबटय़ाचा जनावरांवर पुन्हा हल्ला

प्रतिनिधी/ रत्नागिरी

तालुक्यातील पावस पंचक्रोशीत हल्लेखोर बिबटय़ाचा धुडगूस सुरूच आहे. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी 4 नोव्हेंबर रोजी पुन्हा जनावरांवर हल्ला केला. नाखरे येथे चरण्यासाठी गेलेल्या एका बकरीला ठार केले तर मावळंगे येथे गुरांच्या गोठय़ात घुसून पाडय़ाला गंभीर जखमी केले. एकाच दिवशी झालेल्या या दोन हल्ल्यांमुळे कमालीची दहशत पसरली आहे.

 पावस पंचक्रोशीत पिसाळलेल्या बिबटय़ाने पाळीव जनावरांवर हल्ले सुरू केले आहेत. एक बिबटय़ा जेरबंद झाल्यानंतर दुसऱया बिबटय़ाने प्राण्यांवर सुरू केलेल्या हल्ल्यांनी मोठी दहशत निर्माण झाली आहे. 4 नोव्हेंबरला दुपारी नाखरे खांबडवाडी येथील जयवंत जाधव यांची बकरी रानात चरत असताना बिबटय़ाने हल्ला करून तिला ठार केले. यापूर्वीही जाधव यांच्या दक्षतेमुळे बिबटय़ाच्या हल्ल्यातून बकरी वाचली होती. मात्र बिबटय़ाने पुन्हा एकदा लक्ष्य करून बकरीला ठार केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचदिवशी सायंकाळी मावळंगे येथील रमेश बाळकृष्ण शिंदे यांच्या घराजवळील गोठय़ातील पाडय़ावर हल्ला करून बिबटय़ाने जखमी केले. रमेश शिंदे हे गोठय़ातील गाईचे दूध काढून विश्रांती घेत होते. सायंकाळी 7.45च्या दरम्यान विचित्र वास आल्याने त्यांनी गोठय़ाकडे धाव घेतली. त्यावेळी बिबटय़ाने गोठय़ातील 3 जनावरांपैकी एका पाडय़ाला जखमी केल्याचे त्यांना दिसले. त्यांनी मोठय़ा धैर्याने बॅटरी व काठीच्या सहाय्याने बिबटय़ाला हटकण्याचा प्रयत्न केला. यावेळी बॅटरीचा प्रकाशझोत मारून आरडाओरड केल्याने बिबटय़ा पळून गेला. रात्री बिबटय़ा पुन्हा येण्याच्या शक्यतेने शिंदे यांनी रात्री दोन-अडीचपर्यंत पाळत ठेवली होती.

  ग्रामस्थांवर अधिक सतर्क होण्याची वेळ

बिबटय़ाच्या वावरामुळे खबरदारी म्हणून पाळीव प्राण्यांना चरण्यास सोडणे धोकादायक झाले आहे. या हल्ल्यांबाबत माजी सरपंच विजय चव्हाण यांनी वनविभागाला कळवले. वनपाल गौतम कांबळे, वनरक्षक मिताली कुबल यांनी घटनेचा पंचनामा केला. परिसरात या बिबटय़ाच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आता अधिक सतर्क होण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

Related Stories

वेंगुर्ला पत्रकार संघ बाळशास्त्री जांभेकर चषक क्रिकेट स्पर्धेचा विजेता

Anuja Kudatarkar

रत्नागिरी जिल्हय़ात आणखीन तीन रिपोर्ट पॉझिटीव्ह

Patil_p

संस्थात्मक विलगीकरणासाठी पीपीई किटची मागणी अनाठायी

NIKHIL_N

स्वत:चा जीव पणाला लावत वाचविला कामगाराचा जीव

NIKHIL_N

विनयभंगप्रकरणी आरोपीला कारावास

Anuja Kudatarkar

रत्नागिरी : लोकार्पणानंतर घरांच्या चाव्या घेतल्या परत!

Archana Banage