सांगरुळ / प्रतिनिधी
संततधार पावसामुळे पासार्डे विद्यामंदिर शाळेचा संरक्षक कठडा ढासळला. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सदर घटनेचा पंचनामा गावकामगार पोलीस पाटील, तलाठी , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक यांनी केला आहे.

