Tarun Bharat

पासार्डे येथे रेशन दुकानातून नियमापेक्षा कमी तांदूळ दिल्याने नागरिकांचा गदारोळ

प्रतिनिधी / सांगरुळ

पासार्डे तालुका करवीर येथे लाभार्थ्यांना मोफत वाटला जाणारा तांदूळ नियमानुसार वाटप न केल्याने लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र येत रेशन दुकानदार विरोधात तक्रार करत. प्रशासनाला धारेवर धरले.यावेळी ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे सोशल डिस्टन सिंगचा बोजवारा उडाला. कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासनाने सध्या सर्वत्र संचार बंदी आदेश लागू केला आहे .यामुळे जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन स्तरावरून रेशन दुकानांच्या मार्फत मोफत तांदूळ वाटप सुरू आहे. काही रेशन दुकानातून सध्या मोफत देण्यात येणारा तांदूळ कार्डधारकांना कमी दिला जात आहे. कार्डधारकांना किती धान्य दिलं आहे याची कोणतीही नोंद धान्य दुकानदाराकडे नाही. रेशन दुकानदार लाभार्थ्यासोबत भांडण करून मोफत योजनेचा तांदूळ निम्माच दिला जात असल्याचा प्रकार करवीर तालुक्यातील पासार्डे ( ता.करवीर ) येथे घडला आहे. गावातील पंधराहुन अधिक लाभार्थ्यांनी याबाबतच्या लेखी तक्रार करत ग्रामपंचायत मध्ये ठिय्या मांडला .यानंतर धान्य पुरवठा निरीक्षक लक्ष्मीकांत पाटील, सरपंच वंदना चौगले, तलाठी शर्मिला काटकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता ही बाब उघडकीस आली.

लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य कुटूंबांच्या उदरनिर्वाहासाठी अंत्योदय लाभार्थी आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत प्राधान्यवर्गातील घटकातील लाभार्थ्यांना मोफत तांदूळ दिला जात आहे. त्यानुसार सरकारकडून नियमित रेशन धान्यासोबतच लाभार्थ्यांना पाच किलो मोफत तांदूळ देण्यात येत आहे. पण पासार्डे येथे या योजनेचा तांदूळ निम्माच दिला जात असल्याच्या लेखी तक्रारी ग्रामपंचायतीकडे अनेक लाभार्थ्यांनी केल्या. त्यानंतर येथील सरपंच वंदना चौगुले यांनी करवीर तहसील कार्यालयाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर काल धान्य पुरवठा निरीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह सर्कल, तलाठी, सरपंच यांनी प्रत्येक्ष जाऊन पंचनामा केला. यानंतर धान्यदुकांदाराचे अनेक गैरप्रकार समोर आले. हे धान्य दुकान गावातील महिला बचत गटाकडे चालवण्यास देण्यात आले आहे. १६४० लोकसंख्या असलेल्या या गावासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून ८ एप्रिल रोजी ६५४५ किलो तांदूळ प्राप्त झाला आहे. त्यातील ४४९५ किलो तांदूळ वाटप केला आहे. तर २०२० किलो तांदूळ शिल्लक आहे.

पण तांदूळ वाटप करताना दुकानामध्ये कोणतीही पावती किंवा लाभार्थ्यांची ऑनलाईन यादी नाही. धान्य वाटप केलेल्या ग्राहकांची नावं आणि सही एका कागदावर घेतली आहे. पण प्रत्येक्षात तो लाभार्थी आहे की नाही किंवा किती धान्य दिले याची कसलीही नोंद धान्य दुकानदाराकडे नाही. दरम्यान स्वस्त रेशन धान्य वाटपामध्येही असे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले.दरम्यान रेशन दुकानदार याविरोधात तक्रार घेऊन ग्रामपंचायत मध्ये आलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीचे नियोजन संचारबंदी आदेशाचे पालन करत न केल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचे ढिसाळ नियोजनामूळे सोशल डिस्टन्स सिंगचा बोजवारा उडाला .याची चर्चा उपस्थित ग्रामस्थांतून होत होती.

Related Stories

पक्षांतर बंदी कायद्यानुसार 16 बंडखोर आमदार अपात्र ठरतात

datta jadhav

सोलापूर : उजनी धरणात आवक वाढली, ३२ टक्के पाणीसाठा

Archana Banage

गडमुडशिंगीत तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पाच जण ताब्यात

Abhijeet Khandekar

पिता पुत्राकडून 1 कोटीचा गंडा

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : कासारी नदी पाणी पातळीत घट

Archana Banage

“सरकारची चमचेगिरी करण्याचं काही कारण नाही”

Archana Banage