Tarun Bharat

पिंजऱयात कैद केलेल्या घारीची वनविभागाने केली सुटका

प्रतिनिधी/ कराड

आशियाई महामार्गावर बेलवडे हवेली (ता. कराड) हद्दीत असलेल्या हॉटेल राऊमध्ये वन्य पक्षी घार ही पिंजऱयात बंदिस्त ठेवलेली होती. याबाबतची माहिती मिळाल्याने वनविभागाने तेथे छापा टाकून या घारीची सुटका केली.

हॉटेल राऊमध्ये घार एका पिंजऱयात बंदिस्त ठेवल्याची गोपनीय माहिती पुणे येथील मानद वन्यजीव रक्षक आदित्य परांजपे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ सदर घटना तात्काळ उपवनसंरक्षक सातारा यांना कळवली. परिक्षेत्र वनाधिकारी तुषार नवले, वनरक्षक रमेश जाधवर यांनी या हॉटेलवर छापा मारला. तेथे एका पिंजऱयात बंदिस्त अशी घार ठेवलेली होती. सदर हॉटेल मालक विवेक रामचंद्र देशमुख यांना वनविभागाने नोटीस बजावून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. या घारीस कराडमध्ये आणून तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

Anil Deshmukh case : भाजपकडून एजन्सीचा गैरवापर – सुप्रिया सुळे

Archana Banage

महाराष्ट्र सरकारने एसटी बस प्रवासा संदर्भात घेतला ‘हा’ निर्णय

Tousif Mujawar

रहिमतपूर येथे वानराचा झाडावरून पडल्याने मृत्यू

Patil_p

अभिनेत्री अश्विनी महागंडे रमल्या शेतीत

datta jadhav

देवगड हापूस सातारच्या बाजारपेठेत दाखल

Patil_p

सांगली : आटपाडी शहरासह तालुक्यात 18 कोरोना रुग्णांची भर

Archana Banage