Tarun Bharat

पिंपरी चिंचवडची चिंता वाढली; एकाच दिवशी सहा कोरोना पॉझिटीव्ह

Advertisements

ऑनलाईन टीम / पिंपरी : 

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा धोका वाढला आहे. शनिवारी एकाच दिवशी नवीन सहा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या आता पुन्हा नऊवर गेली आहे. पाच वायसीएमधील आणि एकजण खासगी रुग्णालयात दाखल होता. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबत माहिती दिली.

दहा दिवसांच्या ब्रेकनंतर मागील तीन दिवसांपासून पुन्हा शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी जमात मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांतून आलेल्या दोघांना गुरुवारी आणि त्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील एकाला शुक्रवारी अशा तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांनतर आज पुन्हा एकाचदिवशी सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पिंपरीतील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 9 वर पोहचली आहे.  यापूर्वी पिंपरी-चिंचवडमधील 12 कोरोना रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. 

Related Stories

सोलापुरात आज 49 कोरोनाबाधित रुग्णांची भर, 6 जणांचा बळी

Archana Banage

वंदे भारत एक्सप्रेस लोहमार्गावर बांधणार १००० किमी लांबीच्या सुरक्षा भिंती

Archana Banage

शेअर बाजारात ‘मुहूर्ता’वर दिवाळी

Patil_p

माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे वृद्धापकाळाने निधन

Archana Banage

शिंदें गटाच्या मेळाव्यासाठी झालेल्या खर्चाच्या चौकशीसाठी कोर्टात याचिका दाखल

Archana Banage

”अनिल देशमुखांवरील कारवाई कोर्टाच्या आदेशानुसार, याचा राजकीय अन्वयार्थ काढण्याची गरज नाही”

Archana Banage
error: Content is protected !!